Kantara 2 (फोटो सौजन्य- X अकाउंट)
एखाद्या हिट चित्रपटाचा सिक्वेल किंवा प्रीक्वेल बनवायचा असेल तर त्याची निर्माता-दिग्दर्शकावर जबाबदारी वाढते. या जबाबदारीसोबतच अभिनेता आणि दिग्दर्शक ऋषभ शेट्टी 2022 मध्ये रिलीज झालेल्या त्याच्या ‘कांतारा’ या चित्रपटाचा प्रीक्वेल ‘कांतारा 2’ पूर्ण करण्यात व्यस्त आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागाने प्रेक्षकांना वेडे करून सोडले होते, तेव्हापासून चाहत्यांना या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची आतुरता लागून आहे. आणि या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
चित्रपटाचे चित्रीकरण गेल्या वर्षी खऱ्या ठिकाणी आणि स्टुडिओ सेटअपमध्ये मोठ्या प्रमाणावर करण्यात आले होते. आता चित्रपटाशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘कांतारा 2’ चे शूटिंग पूर्ण होणार आहे. हा चित्रपट पहिल्या भागापेक्षा मोठ्या स्थरावर प्रदर्शित करण्यात येणार आहे.
ऋषभ आणि चित्रपटाच्या टीमने कांताराचे आऊटडोअर भागाचे शूटिंग पूर्ण केले आहे. आता फक्त पंधरा ते वीस दिवसांचे शूटिंग बाकी आहे, जे सेटवर होणार असल्याचे समजले आहे. चित्रपटाचे निर्माते त्याच्या व्हिज्युअल इफेक्ट्सवर बराच वेळ घालवत आहेत. या चित्रपटाचे जेवढे चित्रीकरण झाले आहे, तेवढेच पोस्ट प्रॉडक्शनचे काम देखील सुरु आहे.
होंबळे फिल्म्स आणि ऋषभ आता पुढच्या उन्हाळ्यात ‘कांतारा 2’ थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. कांतारा चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीने बॉक्स ऑफिसवर 80 कोटींची कमाई केली होती हे उल्लेखनीय आहे. आता ‘कांतारा 2’ हा चित्रपट प्रेक्षकांना किती आवडणार आणि कामे करणार ही निर्मात्यांसाठी उत्कंठाची बाब आहे. ‘कांतारा 2’ प्रेक्षकांच्या लवकरच भेटीस येईल ही आशा आहे.