(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
साऊथ सुपरस्टार ऋषभ शेट्टीचा “कांतारा चॅप्टर १” हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंग आधीच सुरू झाले आहे. “कांतारा चॅप्टर १” ने रिलीज होण्यापूर्वीच निर्मात्यांना श्रीमंत केले आहे. निर्मात्यांनी ट्रेलर रिलीज केल्यापासून, चाहते तो थिएटरमध्ये पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. ऋषभ शेट्टीच्या “कांतारा चॅप्टर १” ने अॅडव्हान्स बुकिंगमध्ये किती कोटी रुपये कमवले आहेत ते जाणून घेऊया.
‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीच्या कारचा अपघात, नव्या कोऱ्या मर्सिडीज बेन्झची वाईट अवस्था
चित्रपटाने किती कमाई केली ?
सॅकनिल्कच्या अहवालानुसार, पहिल्या दिवशी “कांतारा चॅप्टर १” चे ५,१९५ शो बुक झाले आहेत. यासह, चित्रपटाची आतापर्यंत १,३१,५२७ तिकिटे विकली गेली आहेत. ब्लॉक सीट्ससह, चित्रपटाची रिलीज होण्यापूर्वीच कमाई ₹८.११ कोटींवर पोहोचली आहे. कन्नडमध्ये सर्वाधिक तिकिटे विकली गेली आहेत. कन्नडमध्ये विकल्या गेलेल्या तिकिटांची संख्या ११८,४४१ होती, तर हिंदीमध्ये विकल्या गेलेल्या तिकिटांची संख्या १०,५०३ होती. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
‘कांतारा’ केले रेकॉर्डस्
ऋषभ शेट्टीच्या ‘कांतारा चॅप्टर १’ चा पहिला भाग २०२२ मध्ये प्रदर्शित झाला. १४ कोटींच्या बजेटमध्ये बनलेला ‘कांतारा’ने बॉक्स ऑफिसवर ४०० ते ५०० कोटींची कमाई केली. आता ‘कांतारा चॅप्टर २’ पहिल्या भागाचा विक्रम मोडेल अशी अपेक्षा आहे. चित्रपटात ऋषभ शेट्टीसोबत गुलशन देवैया, जयराम आणि रुक्मिणी वसंत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या सगळ्या कलाकरांना पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
कला केंद्रातील बैठकीची खोली आता रंगमंचावर, “संगीत बारी ते वारी” संगीत नाटक प्रेक्षकांच्या भेटीस
वरूण धवनच्या चित्रपटाशी टक्कर
दुसरीकडे, ऋषभ शेट्टीचा ‘कांतारा चॅप्टर १’ २ ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे, “कांतारा चॅप्टर १” सोबत, वरुण धवन आणि जान्हवी कपूरचा “सनी संस्कार की तुलसी कुमारी” देखील थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. या दोघांमधील या तीव्र स्पर्धेत कोणता चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाई करतो हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.