फोटो सौजन्य - Jio Cinema सोशल मीडिया
बिग बॉस १८ नवा टाइम गॉड : टीव्हीचा सर्वात मोठा रिॲलिटी शो बिग बॉसच्या या सीझनमध्ये काही खेळाडूंच्या नावांची खूप चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. जसजसा प्रवास पुढे सरकत आहे तसतसे कमकुवत स्पर्धक काढून टाकले जात आहेत आणि बाकीच्यांसोबत प्रवास पुढे सरकत आहे. आतापर्यत बिग बॉसच्या घरामधून हेमा, गुणरत्ने सदावर्ते, नायरा बॅनर्जी, शेहझादा धामी आणि मुस्कान बामणे यांना घराबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. बिग बॉसच्या या सीझनमधील खेळाडूंपैकी शहजादा धामीकडून प्रेक्षकांना मोठ्या अपेक्षा होत्या. अभिनेता ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या टीव्ही सीरियलचा भाग होता पण बिग बॉसमध्ये काही खास दाखवू शकला नाही. प्रीमियर एपिसोडमध्ये, YRKKH च्या निर्मात्यांसोबतच्या लढ्यामुळे तो निश्चितच चर्चेत आला, परंतु त्यानंतर तो लोकांशी फारसा संपर्क साधू शकला नाही. आता बिग बॉसच्या घरामध्ये महायुद्ध सदस्यांच्या दोन संघामध्ये पाहायला मिळणार आहे.
नुकताच बिग बॉस १८ चा एक नवा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये बिग बॉसचा नवा टाइम गॉड कोण होणार हे यासाठी टास्क सदस्यांना देण्यात येणार आहे. या टास्कसाठी बिग बॉसच्या घरामध्ये दोन गट तयार करण्यात आले आहेत. यामध्ये पहिला गट A आहे तो म्हणजेच व्हिव्हियन डिसेनाचा. या गटामध्ये अविनाश मिश्रा, शिल्पा शिरोडकर, इशा सिंग, एलिस कौशिक, चुम दारंग आणि व्हिव्हियन डिसेना हे ग्रुप A मध्ये आहेत. तर दुसरा गट हा करणवीर मेहराचा आहे. या ग्रुप B मध्ये चाहत पांडे, श्रुतिका अर्जुन, दिग्विजय राठी, रजत दलाल आणि स्वतः करणवीर मेहरा हे गटामध्ये असणार आहेत.
Time God ki powers ke liye gharwaale huye divide, par samay hoga kiski side? ⏱️
Dekhiye #BiggBoss18, Mon-Fri raat 10 baje aur Sat-Sun 9:30 baje, sirf #Colors aur @JioCinema par.@bellavita_org #Vaseline @Parle2020cookie #ChingsSecret #BlueHeavenCosmetics #Harpic @mytridenthome… pic.twitter.com/feLujlvxFH
— Bigg Boss (@BiggBoss) November 5, 2024
बिग बॉसच्या सोशल मीडियावर प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये आता टास्कमध्ये बिग बॉसचा आवडता व्हिव्हियन डिसेनाने त्याचे खरे रूप दाखवले आहे. व्हिव्हियन डिसेना आणि त्याचा मित्र अविनाश मिश्रा या दोघांनी मिळून प्लॅनिंग करून रजत दलालला जमिनीवर आपटले आहे. या घटनेवर आता प्रेक्षकांच्या X वर प्रतिक्रिया येत आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, “काल पर्यत हाणामारीच्या संदर्भात ज्ञान देत होते आज त्यांच्या राजाने (व्हिव्हियन डिसेना) आणि अविनाशने मिळून रजत दलालला खाली पडले बिग बॉसची उपलब्धी”
Kal tak voilence pr gyan dene wale aaj bada khus honge Becoz unke raja or avinash ne milakar #RajatDalal ko gira diya bigg achivement 😂😂
— 𝚂𝚑𝚞𝚋𝚑… (@S_h_ubh__) November 5, 2024
दुसऱ्या X अकाऊंवर युसरने लिहिले आहे की, ही शारीरिक हिंसा नाही आहे का? जर रजतने धक्का मारला असता तर ये दोघांनी (म्हणजेच व्हिव्हियन डिसेना आणि अविनाश मिश्रा) तर बिग बॉसकडे बाहेर काढण्याची मागणी केली असती.
Ye physical voilence nhi hai..??
Agar rajat Dhakka maar de to yah bkl dono ke dono Big Boss ke ghar mein bhi nahi dikhenge..👍#BiggBoss18 || #BB18 || #BiggBoss || #RajatDalal || #GorillaGang
— ︵✰𝙑𝙖𝙣𝙨𝙝 𝘾𝙝𝙤𝙪𝙙𝙝𝙖𝙧𝙮 ࿐ ♚ (@vanshbaliyan_11) November 5, 2024