
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
धर्मेंद्र हे भारतीय चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज अभिनेता आहेत, ज्यांना त्यांच्या दमदार व्यक्तिमत्त्व आणि बहुआयामी अभिनयासाठी ओळखले जाते. ते फक्त चित्रपटातच नव्हे, प्रत्यक्ष आयुष्यातही धैर्यवान आणि प्रभावशाली म्हणून प्रसिद्ध आहेत. ज्यांनी आयुष्यात अनेक अडचणींना सामोरे गेले, पण नेहमीच विजय त्यांच्या बाजूने राहिला. धर्मेंद्र यांनी एकदा अंडरवर्ल्डला धमकी दिली होती, ज्यामुळे ते त्यांच्याशी पंगा घेण्यास घाबरत होते. काही काळापूर्वी, धर्मेंद्र यांनी एका मुलाखतीत सांगितले की, “तुम्ही 10 लोक असाल, पण मी एक आर्मी आहे.” या विधानामुळे अंडरवर्ल्डच्या लोकांना त्यांच्याशी वाद घालण्याची इच्छा कमी झाली होती. धर्मेंद्र यांच्या या धमकीमुळे अंडरवर्ल्डच्या लोकांनी त्यांच्याशी पंगा घेण्याचे धाडस दाखवलं नाही.
धर्मेंद्र यांच्या धैर्याचे आणि धाडसाचे किस्से खूप प्रसिद्ध आहेत. अभिनेता-दिग्दर्शक सत्यजीत पुरी यांनी अलीकडेच धर्मेंद्रच्या अनेक किस्स्यांची आठवण करून दिली आणि सांगितले की, ”अंडरवर्ल्डचे लोकही त्यांच्याशी पंगा घेण्यापासून दूर राहत होते. चित्रपट क्षेत्रात अंडरवर्ल्डचा हस्तक्षेप असताना धर्मेंद्र यांचा थेट सामना झाला, तरीही त्यांच्या कुटुंबाला कधीही भीती वाटली नाही.”
सत्यजीत पुरी यांनी सांगितले, “त्या काळात अंडरवर्ल्ड खूप मजबूत होता. जेव्हा अंडरवर्ल्ड एखाद्या अभिनेत्याला कॉल करायचे, तेव्हा अनेक जण घाबरत. पण धर्मेंद्र आणि त्यांचे कुटुंब कधीही त्यांच्यापासून घाबरले नाहीत.”
बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार ‘Kantara- Chapter 1’; ‘या’ तारखेला OTT प्लॅटफॉर्मवर येणार
धर्मेंद्र यांनी अंडरवर्ल्डच्या लोकांना सांगितलं होतं, “जर तुम्ही आलात, तर संपूर्ण साहनेवाल पंजाबमधून येईल. तुझ्याकडे १० लोक आहेत, पण माझ्याकडे एक सैन्य आहे. मी एकदा बोललो की, ट्रक भरून पंजाबमधून लढायला येतील. माझ्याशी पंगा घेऊ नको.” आणि त्यानंतर त्यांनी कधीच धर्मेंद्र यांच्याशी पंगा घेतला नाही.
सत्यजीत पुरी यांनी सांगितले, “एकदा एका चाहत्यानं धर्मेंद्रवर चाकूने हल्ला केला आणि धर्मेंद्र यांनी त्याला फक्त एका मिनिटात सरळ केलं होतं. आजकाल अभिनेते सहा गनमॅन आणि इतर लोकांसोबत फिरतात, पण त्या काळात धर्मेंद्र आणि विनोद खन्ना बिनधास्त फिरायचे.”