बॉईज सिरीजने सर्वांचच भरपूर मनोरंजन केले आहे. धैर्य, ढुंग्या आणि कबीर या त्रिकूटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रेम मिळालं. ‘बॉईज’ आणि ‘बॉईज २’ ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर ‘बॉईज ३’ (Boys 3) काय नवीन हंगामा घेऊन येणार याकडे प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. नुकताच ‘बॉईज ३’च्या संपूर्ण टीमच्या उपस्थितीत या चित्रपटाचा ट्रेलर (Boys 3 Trailer Release) नुकताच प्रदर्शित झाला.
‘बॉईज ३’ चित्रपटाचा ट्रेलर पाहून हे त्रिकूट आणि विदुला करत असलेल्या प्रवासाची झलक आपल्याला पाहायला मिळत आहे. तीन मित्र आणि विदुला दक्षिण दिशेला करत असलेल्या प्रवासाची ही गोष्ट आहे. त्यांच्या या प्रवासात आलेलं विदुला नावाचे वळण कोणत्या ठिकाणी या तिघांना घेऊन जाणार ते चित्रपट पहिल्या नंतरच कळणार. विदुलाचा कमाल अंदाज, सुमंत शिंदे,पार्थ भालेराव, प्रतीक लाड यांच्या उत्कृष्ट अभिनयाने रंगलेला हा चित्रपट येत्या १६ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटातील ‘लग्नाळू २.०’ गाण्यातून विदुलाची वेगळीच छबी या चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर आली आहे.
या ट्रेलरबद्दल अवधूत गुप्ते म्हणतात, “ बॉईज ३ चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडेल याची खात्री आहे. ट्रेलर पाहून या चित्रपटासाठीची प्रेक्षकांची वाढती उत्सुकता पाहून खूप भारी वाटत आहे. सर्वच ‘बॉईज ३’ च्या टीमने खूप मेहनत घेतलेली आहे. प्रेक्षकांच्या अपेक्षांवर हा चित्रपट खरा उतरेल याची मला खात्री आहे.”
दिग्दर्शन विशाल देवरुखकर म्हणतात,“ ‘बॉईज’ आणि ‘बॉईज २’ ला मिळालेल तुफान प्रतिसाद पाहता मनोरंजनात भर म्हणून यंदा ‘बॉईज ३’ तुमच्या भेटीला घेऊन येत आहोत. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून सर्वच कलाकारांनी आपापली भूमिका चोख बजावली आहे. १६ सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार असून सर्व प्रेक्षक वर्गाचा प्रेम आणि आशीर्वाद राहो अशी आशा आहे.”
[read_also content=”कोळीवाड्यांना एसआरएमध्ये घेणार नाही, क्लस्टर प्रमाणे विचार; उपमुख्यमंत्र्यांची माहिती https://www.navarashtra.com/maharashtra/koliwadas-will-not-be-taken-into-sra-thinking-like-a-cluster-deputy-chief-minister-nrab-319004/”]
सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि प्रोडक्शन अंतर्गत एव्हरेस्ट एंटरटेनमेंटसह अवधूत गुप्ते प्रस्तुत ‘बॉईज ३’ चे दिग्दर्शन विशाल सखाराम देवरुखकर यांनी केले असून लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे, संजय छाब्रिया यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.