सेलिब्रिटी 'गुढीपाडवा'..., मराठमोळे कलाकार कसे सेलिब्रेट करतात मराठी नववर्ष ?
३० मार्च हा महाराष्ट्रातल्या नागरिकांसाठी आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस आहे. कारण या दिवशी ‘गुढीपाडवा’ हा सण मोठ्या उत्साहात म्हणून साजरा साजरा केला जातो. मराठी महिन्याचा हा पहिला दिवस असल्यामुळे त्याचे प्रतिबिंब हे फक्त सामान्य कुटुंबातच उमटत नाही तर सेलिब्रिटी कलाकारांमध्ये सुद्धा हा सण अधोरेखित केला जातो. स्टार प्रवाहवर काम करणाऱ्या कलाकारांनी या निमित्ताने आपल्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
बिग बॉस फेम अभिनेत्रीचं लेखन क्षेत्रात पदार्पण, तगडी स्टारकास्ट असणाऱ्या चित्रपटाचं केलं लेखन
ही दशकापूर्वी प्रत्येकाच्या दारात गुढी ही उभारली जात होती. त्यानिमित्ताने रांगोळी, गोड पदार्थाची तयार केले जात होते. पुजाअर्चा आणि सोबतीला एकत्रितपणे स्वादिष्ट भोजन हे या गुढीपाडव्याचे महत्त्व होते आणि एकत्रितपणे त्याचा आनंद घेतला जात होता. परंतु हा मराठी महिन्याचा पहिला दिवस आहे हे मात्र फारसे अधोरेखित केले जात नव्हते. इंग्रजी महिन्याप्रमाणे ३१ डिसेंबरला मोठ्या उत्साहात संपूर्ण जग नव्या वर्षाचे स्वागत करत असेल तर मराठीच्या बाबतीत असे का? असा प्रश्न निर्माण होत होता. अलीकडे असे फक्त सेलिब्रिटी कलाकारांना वाटत नाही तर संस्था, संघटना यांना सुद्धा वाटायला लागलेले आहे. त्यामुळे सोसायटीत, इमारतीत, मोठ्या, छोट्या वस्तीत गुढीपाडवा साजरा करणे हे वाढलेले आहे. इतकेच काय तरी या निमित्ताने अलीकडे मोठ्या प्रमाणात शोभायात्रा काढल्या जातात.
बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरलेला ‘देवा’ आता ओटीटीवर धुमाकूळ घालणार, केव्हा आणि कुठे रिलीज होणार चित्रपट ?
महाराष्ट्राच्या परंपरेने आलेली वेशभूषा, रंगभूषा येथे केली जाते. ज्या क्रांतिवीरांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यांचे स्मरण केले जाते. नृत्य, युद्धकला याचे दर्शन घडवले जाते. ढोल ताशे, नगारे, लेझीम पथक या साऱ्या गोष्टी शोभायात्रेमध्ये सहभागी होत असतात. सर्व उपस्थित नागरिकांचे लक्ष वेधले जाईल अशा रांगोळ्या, जागोजागी काढल्या जातात याचे कौतुक फक्त मराठी माणसाला राहिलेले नाहीत तर महाराष्ट्रा कर्मभूमी म्हणून वास्तव्य करणाऱ्या अमराठी नागरिकांना सुद्धा या गोष्टीचा हेवा वाटायला लागलेला आहे. एकंदरीत काय तर जिकडे, तिकडे मराठी बाणा दिसेल असे पाहिले जातं आहे आणि हा सार्थ अभिमान कलाकार मंडळी सुद्धा व्यक्त करतात आणि विशेष म्हणजे या निमित्ताने ‘स्टार प्रवाह’ या वाहिनीवर काम करणाऱ्या कलाकारांनी या दिलेल्या शुभेच्छा !
Kunal Kamra Controversy: कॉमेडियन कुणाल कामराची हायकोर्टात धाव…, एकनाथ शिंदेंवरील वक्तव्य प्रकरण
विजय आणि विवेक
विजय आंदळकर हा ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेतील पार्थची तर विवेक सांगळे हा ‘लग्नानंतर होईल प्रेम’ या मालिकेत जीवाची व्यक्तिरेखा साकार करतो. ‘मराठी नवीन वर्ष नेहमीच माझ्यासाठी नवी उमेद, नवी प्रेरणा घेऊन येतं. मागच्या वर्षी ज्या गोष्टी करायच्या राहून गेल्यात अश्या अनेक गोष्टी मी या नवीन वर्षी करण्याचा प्रयत्न करणार आहे. सेटवर सुद्धा आम्ही कलाकार गुढी उभारुन उत्साहात गुढीपाडवा साजरा करणार आहोत.
याबाबतीत विवेक प्रतिक्रिया देतो, ‘मी लालबाग-परळ भागात रहात असल्यामुळे प्रत्येक मराठी सण उत्साहात साजरा केला जातो. त्यामुळे प्रत्येक सण खूप जवळचा आहे. सण जसा जवळ येतो तशी उत्सुकता वाढत जाते. आमच्या सोसायटीमध्ये दरवर्षी गुढीपाडव्याला गुढी उभारण्यासोबतच शोभायात्रा आणि सोबत पालखी देखिल निघते. त्यामुळे त्याची देखील लगबग असते. पताका आणि कंदील लावून संपूर्ण सोसायटी सजवली जाते. शूटिंगचं वेळापत्रक सांभाळून मी आवर्जून यात सहभागी होतो. मी स्वतःला भाग्यवान समजतो की मी गिरणगावात जन्मलो जिथे प्रत्येक सण जल्लोषात साजरा केला जातो.’ हा आनंद प्रेक्षकांच्या सुद्धा वाटायला यावा असे या दोघांचे सांगणे आहे.
‘सिकंदर’च्या तिकिटांचे दर गगनाला भिडले, अॅडव्हान्स बुकिंगची किंमत पाहिलीत का ?
गिरीजा आणि मृणाल
गिरीजा प्रभू ही ‘कोण होतीस तू, काय झालीस तू’ मालिकेत कावेरीची व्यक्तिरेखा साकार करते आहे तर तर मृणाल दुसानिस ही ‘लग्नानंतर होईल प्रेम’ या मालिकेत नंदिनी साकार करते. ‘गुडीपाडव्याच्या सणादिवशी सकाळी लवकर उठून गुढी उभारायची तयारी, गोडाधोडाचा नैवेद्य करायचा आणि सहकुटुंब जेवणाचा आनंद लुटायचा हे दरवर्षी नित्यनेमाने करते. सणानिमित्ताने गोड जेवणावर ताव मारता येतो. यंदाचा गुढीपाडवा माझ्यासाठी खुपच खास माझी नवी मालिका सुरु होते आहे. या मालिकेसाठी जोरदार तयारी सुरु आहे. त्यामुळे यंदा संकल्प हाच आहे की आणखी चांगलं काम करायचं आहे’. ही प्रतिक्रिया गिरिजाची आहे.
मृणाल सांगते, ‘माझी मुलगी पहिल्यांदाच भारतामधले सण साजरे करणार आहे. त्यामुळे तिच्यासाठी गुढीपाडव्याचा सण खास असेल. गुढीची पूजा, श्रीखंड-पुरीचा नैवेद्य आणि कैरीचं पन्ह हे न चुकता दरवर्षी बनवलं जातं. यंदा संकल्प असा केलाय की धकाधकीच्या आयुष्यातून येईल तो क्षण छान जगायचा. खूष रहाण्याचा प्रयत्न करायचा, तब्येतीची काळजी घ्यायची आणि मुलीला जास्तीत जास्त वेळ द्यायचा’. तूर्तास तुम्हा सर्वांना शुभेच्छा !