Shahid Kapoor Deva Movie Released On OTT
बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. कायमच वेगवेगळ्या चित्रपटांतून आपल्या अभिनयाच्या माध्यमातून शाहिदने चाहत्यांचे मन जिंकले. अलीकडेच शाहिद कपूरचा ‘देवा’ चित्रपट रिलीज झाला. तो या चित्रपटामध्ये अभिनेत्याने एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. पुन्हा एकदा डॅशिंग अवतारातून अभिनेता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
शाहिदचा केव्हाही न पाहिलेला अंदाज नेटकऱ्यांना प्रचंड भावला असला तरीही प्रेक्षकांकडून चित्रपटाला म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. बॉक्स ऑफिसवर संमिश्र प्रतिसाद मिळालेला ‘देवा’ चित्रपट आता ओटीटीवर रिलीज होणार आहे. जाणून घेऊया तो कधी, कुठे प्रदर्शित होणार?
‘सिकंदर’च्या तिकिटांचे दर गगनाला भिडले, अॅडव्हान्स बुकिंगची किंमत पाहिलीत का ?
शाहिद कपूरचा अॅक्शन थ्रिलर ‘देवा’ चित्रपट ३१ जानेवारीला प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात बऱ्याच दिवसांनंतर शाहिदचा अॅक्शन अवतार पाहायला मिळाला होता, जो प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला. पण, शाहिदच्या ‘देवा’ चित्रपटाला प्रेक्षकांचा हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. माहितीनुसार, ५० कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटानं जगभरात ५१.७३ कोटींची कमाई केली आहे. तर देशात फक्त ३७.८६ कोटींचा गल्ला जमवला. बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरलेला शाहिदचा आता ‘देवा’चित्रपट प्रेक्षकांना घरबसल्या पाहता येणार आहे.
‘चल जाऊ डेटवर’, समीर चौघुले सई ताम्हणकरला म्हणतो…
‘देवा’ चित्रपट आज म्हणजेच, २८ मार्चपासून ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. हा अॅक्शन थ्रिलर चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहता येणार आहे. शाहिद कपूरच्या ‘देवा’ चित्रपटाचं दिग्दर्शन लोकप्रिय मल्याळम दिग्दर्शक रोशन अॅण्ड्रयुज यांनी केलं होतं. तर निर्मिती, झी स्टुडिओज आणि रॉय कपूर फिल्म्सने केली होती. ‘देवा’ चित्रपटात शाहिदने पोलीस अधिकारी देव अंब्रेच्या भूमिकेत होता. त्याच्यासोबत प्रमुख भूमिकेत अभिनेत्री पूजा हेगडेही पाहायला मिळत आहे. त्याशिवाय ‘देवा’मध्ये कुबरा सैत आणि पवेल गुलाटीसह बरेच कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहे.
‘सिकंदर’च्या रिलीजआधी रश्मिका मंदानाचं मोठं वक्तव्य; म्हणाली, “मी टेंशनमध्ये आहे कारण…”
शाहिद कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर, अभिनेता शेवटचा ‘तेरी बातों मे ऐसा उलझा जिया’चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटात शाहिदने क्रिती सेनॉनसोबत स्क्रिन शेअर केली होती. आता लवकरच अभिनेत्याची ‘फर्जी २’वेब सीरिजही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शाहिदच्या ‘फर्जी’ सीरिजच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे ‘फर्जी २’ सीरिजची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत आहेत. सध्या शाहिद विशाल भारद्वाज यांच्या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. या चित्रपटाचं नाव ‘अर्जुन उस्तरा’ असं असून, त्यामध्ये शाहिद अभिनेत्री तृप्ती डिमरीसह पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.