नाग अश्विन यांनी दिगदर्शित केलेला कल्की चित्रपट सध्या चित्रपट गृहांमध्ये दमदार कमाई करत आहे. या चित्रपटाने आतापर्यत ८३२ कोटींचा टप्पा गाठला आहे. या चित्रपटांमध्ये अनेक मोठ्या कलाकारांचा समावेश आहे. साऊथ सिनेमांचा सुपरस्टार प्रभास या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत आहे. त्याचबरोबर बॉलीवूड प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण सुद्धा या चित्रपटाचा भाग आहे. त्याचबरोबर कमल हसन, अमिताभ बच्चन या मोठ्या कलाकारांनी भरलेला हा चित्रपट आहे. त्याचबरोबर अभिनेत्री दिशा पटानी सुद्धा या चित्रपटाची एक भाग आहे. तिने काही बिटीएस फोटो शेअर केले आहेत यावर एकदा नजर टाका.

अभिनेत्री दिशा पटानीने चित्रपट कल्कीमधील मुख्य भूमिकेत असलेला प्रभाससोबत खास फोटो शेअर केला आहे.

अभिनेत्री दिशा या चित्रपटामध्ये ऍक्शन करताना दिसणार आहे, तिच्या या भूमिकेचे चाहत्यांनी कौतुक केले आहे.

चित्रपटाचे शूटिंग वेगवेगळ्या ठिकाणी झाले आहे, थंड हवेच्या ठिकाणी झालेल्या शूटिंगमध्ये दिशा क्युट अवतारात दिसत आहे.

त्याचबरोबर तिने तिच्या संपूर्ण टीमसोबत एक फोटो शेअर केला आहे, यामध्ये त्याचे दिग्दर्शक, अभिनेता प्रभास आणि इतर सर्व टीम दिसत आहे.

या चित्रपटामध्ये ती एका डॅशिंग लुकमध्ये दिसली आहे. त्याचबरोबर ती टॅटू लुकमध्ये सुद्दा पाहायला मिळणार आहे तिचा हा लुक आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.






