Volvo Car India कडून अरावली पर्वतरांगांमध्ये 20,000 हून अधिक वृक्षारोपण
हा उपक्रम FY25-26 साठी Volvo Car India च्या CSR (Corporate Social Responsibility) अंतर्गत राबवला जात असून, SankalpTaru Foundation यांच्या नेतृत्वाखाली आणि हरियाणा वन विभागाच्या सहकार्याने ‘Community Barren Land Transformation Project’ चा भाग म्हणून साकारला जात आहे.
Year Ender 2025: या वर्षातील टॉप 5 Budget Friendly Bikes, किंमत कमी आणि मायलेजची हमी
गेल्या वर्षी Reverse Project अंतर्गत Volvo Car India ने गाझियाबादमधील एका शहरी कचराभूमीचे रूपांतर 35,000 हून अधिक झाडे लावून हिरव्या जंगलात केले होते. यावर्षी हा उपक्रम पुढे नेत गुरुग्राममधील अरावली भागात स्थानिक व हवामान-सहनशील प्रजातींची लागवड करण्यात येणार आहे.
या उपक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस 2 ते 3 geo-tagged रोपे त्यांच्या वतीने लावली जाणार आहेत. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी इच्छुक नागरिक https://reverseproject.volvocarindia.com/ या वेबसाइटवर नोंदणी करू शकतात.
अरावली पर्वतरांग दिल्ली-एनसीआर परिसराला वाळवंटीकरण आणि वाढत्या प्रदूषणापासून संरक्षण देणारी नैसर्गिक ढाल मानली जाते. मात्र, खाणकाम, नागरीकरण आणि पर्यावरणीय ऱ्हासामुळे या भागातील मोठ्या प्रमाणावर जमीन खराब झाली आहे. मातृ वन परिसर अर्ध-कोरड्या भूभागाचा असून, मृदा क्षरण, कमी वनस्पती आणि पाण्याची कमतरता ही आव्हाने आहेत.
Mahindra XUV 7XO चा अजून एक टिझर प्रदर्शित, आता मिळाली ‘या’ नवीन फीचर्सची माहिती
वैज्ञानिक पद्धतीने आखलेल्या वृक्षारोपणाद्वारे या परिसराचे रूपांतर स्वयंपूर्ण, जैवविविधतेने समृद्ध जंगलात करण्याचा या प्रकल्पाचा उद्देश आहे. यामुळे हवा शुद्ध होणे, जैवविविधता वाढणे तसेच माती व जलसंधारण सुधारण्यास मदत होणार आहे.
स्वीडनची लक्झरी कार निर्माता कंपनी Volvo ने 2007 मध्ये भारतात प्रवेश केला. सध्या कंपनीकडे देशभरात 25 डीलरशिप्स असून अहमदाबाद, बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली-एनसीआर, मुंबई, पुणे, कोलकाता, हैदराबाद, जयपूर, कोची, सुरत, विशाखापट्टणम आदी शहरांमध्ये Volvo Cars उपलब्ध आहेत.






