Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मातीत रुजलेली, देवभूमीत साकारलेली भव्य कथा रुपेरी पडद्यावर अनुभवता येणार; ‘दशावतार’ची रिलीज डेट जाहीर

देवभूमीत रुजलेली, कोकणच्या मातीत सजलेली एक भव्य गाथा पडद्यावर साकारली जातेय. कोकणची लाल माती आणि त्या मातीतील कलेवर जीवापाड प्रेम करणाऱ्या एका निष्ठावान कलाकाराचा अवतार धारण होतोय. हा अवतार म्हणजेच दशावतार!!!

  • By चेतन बोडके
Updated On: Jul 02, 2025 | 05:54 PM
मातीत रुजलेली, देवभूमीत साकारलेली भव्य कथा रुपेरी पडद्यावर अनुभवता येणार; ‘दशावतार’ची रिलीज डेट जाहीर

मातीत रुजलेली, देवभूमीत साकारलेली भव्य कथा रुपेरी पडद्यावर अनुभवता येणार; ‘दशावतार’ची रिलीज डेट जाहीर

Follow Us
Follow Us:

देवभूमीत रुजलेली, कोकणच्या मातीत सजलेली एक भव्य गाथा पडद्यावर साकारली जातेय. कोकणची लाल माती आणि त्या मातीतील कलेवर जीवापाड प्रेम करणाऱ्या एका निष्ठावान कलाकाराचा अवतार धारण होतोय. हा अवतार म्हणजेच दशावतार!!!

चिमणराव, श्रीयुत गंगाधर टिपरे, चिंची चेटकीण, चौकट राजा, तात्या विंचू या आणि अशा अनेकविध भूमिकांना मालिका, रंगभूमी आणि चित्रपटाच्या पडद्यावर सजीव करणारे नटश्रेष्ठ दिलीप प्रभावळकर वयाच्या या टप्प्यावर पुन्हा एका नव्या अवतारात रूपेरी पडद्यावर रसिकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाले आहेत. “दशावतार” या निसर्गरम्य कोकणच्या पार्श्वभूमीवर बनलेल्या, एका सस्पेन्स थ्रिलर भव्य चित्रपटात ते अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत.

‘पारू’ फेम अभिनेत्याचे ‘त्या’ व्हिडिओवर स्पष्टीकरण; म्हणाला, “मी फक्त ‘पारू’ मालिकेबद्दल…”

आजवरच्या त्यांच्या भूमिकांपेक्षा ही वेगळीच भूमिका असून रसिकांना ते पुन्हा आश्चर्यचकित करणार आहेत. झी स्टुडियोज् प्रस्तुत ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊस निर्मित “दशावतार” हा चित्रपट कोकणातील अद्भुत निसर्ग, तिथल्या रूढीपरंपरा, मान्यता, लोककला यांचं मनोरम्य दर्शन घडवणारा आणि तितकीच त्याला गूढ, उत्कंठावर्धक, वेगवान, थरारकथेची जोड असलेला हा चित्रपट आहे. चित्रपटाची कथा, पटकथा लेखन आणि दिग्दर्शन सुबोध खानोलकर यांनी केले आहे.

‘बिग बॉस’ फेम प्रसिद्ध कपल लवकरच करणार लग्न, कॉमेडियन कृष्णा अभिषेकने केली पुष्टी?

चित्रपटाची निर्मिती सुजय हांडे, ओंकार काटे, सुबोध खानोलकर, अशोक हांडे, आदित्य जोशी, नितिन सहस्त्रबुद्धे, मृणाल सहस्त्रबुद्धे, संजय दुबे, विनायक जोशी यांनी केली आहे. तर चित्रपटाचे कलानिर्माते अजित भुरे असून कोकणात घडणाऱ्या गूढ कथेवर दशावतार चित्रपटाची बांधणी करण्यात आली आहे. १२ सप्टेंबर ला हा चित्रपट रूपेरी पडद्यावर झळकणार आहे. याची पहिली झलक लवकरच झी मराठीवर रसिकांना पाहायला मिळणार आहे.

Web Title: Dilip prabhavalkar starrer dashavatar movie first look released on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2025 | 05:54 PM

Topics:  

  • marathi actor
  • marathi movie

संबंधित बातम्या

Afratafri Movie: ‘अफरातफरी’मध्ये ग्लॅमरचा तडका अन् मस्तीचा जल्लोष! ‘होऊन जाऊ दे’ गाणं प्रदर्शित
1

Afratafri Movie: ‘अफरातफरी’मध्ये ग्लॅमरचा तडका अन् मस्तीचा जल्लोष! ‘होऊन जाऊ दे’ गाणं प्रदर्शित

Pach Futacha Bachchan Movie: कीर्तन, कोल्हापुरी भाषा अन् नाट्यमय कथा, पाच फुटाचा बच्चन’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष
2

Pach Futacha Bachchan Movie: कीर्तन, कोल्हापुरी भाषा अन् नाट्यमय कथा, पाच फुटाचा बच्चन’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष

Gondhal Marathi Movie: ‘गोंधळ’ची ऑस्करवारी सुरू! मुख्यमंत्र्यांची भेट घेत टीमने केली ‘ही’ खास मागणी
3

Gondhal Marathi Movie: ‘गोंधळ’ची ऑस्करवारी सुरू! मुख्यमंत्र्यांची भेट घेत टीमने केली ‘ही’ खास मागणी

Aali Mothi Shahani Movie: हृता-सारंगची ऑनस्क्रीन जुगलबंदी; ‘बोनिता बोनिता’ गाण्याने वेधलं लक्ष
4

Aali Mothi Shahani Movie: हृता-सारंगची ऑनस्क्रीन जुगलबंदी; ‘बोनिता बोनिता’ गाण्याने वेधलं लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.