सध्या दुबईमध्ये आयफा पुरस्कार (IIFA Awards) सोहळयाची धूम सुरू आहे. या शोमध्ये गायक आणि रॅपर हनी सिंगनं (Honey Singh) आपल्या परफॅार्मन्स दरम्यान स्टेजवरून खाली येत ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्यासमोर नतमस्तक झाला. सध्या हा व्हिडीओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला असून नेटकीर हनी सिंगचं कौतुक करत आहे.
आयफा पुरस्कार सोहळ्यामध्ये हनी सिंहनं एक खास परफॉर्मन्स केला. तो परफॉर्म करत असताना ए. आर. रहमान हे प्रेक्षकांमध्ये बसले होते. त्यावेळी हनी सिंह हा स्टेजच्या खाली येतो आणि ए.आर. रहमान यांच्या समोर नतमस्तक होतो. यावेळी ए.आर.रहमान यांनीही हनीला आशीर्वाद दिला. आयफाच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन हनी सिंहचा फोटो शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडओ नेटकऱ्यांच्या पंसतीस उतरला असून ते हनी सिंहचं कौतुकाचा वर्षाव करणारे कमेंन्ट्स करत आहे.
[read_also content=”उत्तर प्रदेशातील रासायनिक कारखान्यामध्ये स्फोटात १२ जणांचा मृत्यू https://www.navarashtra.com/latest-news/blast-in-chemical-factory-at-uttar-pradesh-nrgm-288798.html”]
हनी सिंग बराच वेळ असाच बसून राहिला. यादरम्यान एआर रहमान सतत हनी सिंगला उचलण्याचा प्रयत्न करत होता, मात्र तो उठला नाही, नंतर एआर रहमानने सीटवरून उभे राहून हस्तांदोलन केले तेव्हा हनी सिंगने त्याच्या हाताचे चुंबन घेतले.