भावाच्या आठवणीत अपूर्वा नेमळेकरची भावूक पोस्ट; म्हणाली, 'कदाचित, मी तो दिवस बदलू शकले असते तर...'
‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेतून शेवंता पात्र साकारून प्रसिद्धीझोतात आलेली अपूर्वा नेमळेकर सध्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. अपूर्वा नेमळेकरच्या छोट्या भावाचं १४ एप्रिल २०२३ रोजी निधन झालं होतं. त्याच्या आठवणीत अपूर्वाने इन्स्टाग्रामवर एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. तिच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
१४ एप्रिल २०२३ रोजी अपूर्वा नेमळेकरच्या छोट्या भावाचं ओमकराचं निधन झालं होतं. त्याचं निधन हृदयविकाराच्या तिव्र झटक्यामुळे झालं होतं. तो २८ वर्षांचा होता. आज ओमकारच्या निधनाला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने अपूर्वाने त्याच्या आठवणीत भावुक पोस्ट लिहिली आहे.
भावाच्या आठवणीत अपूर्वा नेमळेकरने पोस्ट लिहिली आहे की…
१४ एप्रिल – या दिवसाने आयुष्यात सर्व काही बदलून टाकले.
आजच्या दिवशी मी फक्त माझ्या धाकट्या भावालाच नाही तर माझ्या आत्म्याचा एक भागही गमावला आहे. त्याचे निधन होऊन आज दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. असा एकही दिवस जात नाही, की त्या दिवशी तुझी आठवण येत नाही. ओमकार, मी दररोज सकाळी उठते आणि विचार करते की, त्या दिवशी नियतीने थोडी दया दाखवली असती तर… कदाचित, मी तो दिवस बदलू शकले असते तर… १४ एप्रिल २०२३, माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवस होता…
वयाने लहान असला तरी, तू माझा मार्गदर्शक, माझा सर्वात चांगला मित्र, माझा सतत टीकाकार आणि खूप हुशार होतास तू. तू माझा आधारस्तंभ होतास, ज्या व्यक्तीकडे मी सर्वात सिंपल किंवा सर्वात गुंतागुंतीच्या प्रश्नांची उत्तरे शोधू शकले असते. तू फक्त माझा भाऊच नाहीस तर, तू माझा साथीदार आणि माझी सुरक्षित जागा होतास. या दोन वर्षांत मी खूप काही गमावले आहे. असे असंख्य क्षण आले, जेव्हा मी आजूबाजूला पाहिले तेव्हा तू तिथे असायला हवे होते. हसणे, चिडवणे, सल्ला देणे, फक्त तू असायला हवा होतास. आयुष्य पुढे गेलं आहे, पण मी अजूनही तिथेच आहे. मला वाटतं नाही की, मी कधीही पुढे जाऊ शकेन.
काहीही करू न शकल्याची अपराधी भावना… ती कायम राहिल. दररोज माझ्या हृदयावर त्याचा भार राहिल. मला आशा आहे की, तू कुठेही असशील, शांती आणि प्रकाशमय वातावरण असलेल्या ठिकाणीच तू असशील. पण इथे, तुझी अनुपस्थिती ही एक वेदनादायक आहे, जी मी शांतपणे सहन करते. मला तुझी खूप आठवण येते, ओम… तू इथे आता असला असता तर खूप बरं झालं असतं. कायमच तुझी आठवण येत राहिल, तुझीच अप्पू…
कार्तिकी गायकवाडने अखेर लेकाचा चेहरा दाखवला, अंगाई गीत गात सांगितलं नाव; क्यूट Video Viral