Tamannaah Bhatia Vijay Varma Breakup Chiranjeevi Gave Special Advice To Actress
कायमच आपल्या दिलखेचक डान्स मुव्ह्जने चाहत्यांना आपलंसं करणारी तमन्ना भाटिया सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि अभिनेता विजय वर्माच्या ब्रेकअपची चर्चा रंगली आहे. अद्याप दोघांनीही ब्रेकअपच्या चर्चांवर अधिकृतपणे भाष्य केलेले नाही. अशातच सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होतेय, त्या पोस्टमध्ये दोघांच्याही ब्रेकअपमागील खरं कारण समोर आलं आहे. नेमकं तमन्ना आणि विजयचं नातं का तुटलं ? जाणून घेऊया…
कार्तिकी गायकवाडने अखेर लेकाचा चेहरा दाखवला, अंगाई गीत गात सांगितलं नाव; क्यूट Video Viral
विकी लालवानीने इन्स्टाग्रामवर लिहिलेल्या पोस्टमधून तमन्ना भाटिया आणि विजय वर्माच्या ब्रेकअपचं कारण समोर आलं आहे. त्याने शेअर केलेल्या पोस्टनुसार, तमन्नाच्या वडिलांना विजय वर्माबरोबरचं नातं अजिबात आवडलं नव्हतं. दोघांच्याही नात्याला ते पूर्णपणे विरोध करत होते. पण जेव्हा तमन्ना आणि विजयने २०२४ किंवा २०२५ मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा अभिनेत्रीच्या वडिलांनी होकार दिला आणि लग्नाचा निर्णय स्वीकारला. पण नंतर तमन्नाने लग्नाचा विषय काढला नाही. त्यामुळे वडील हैराण झाले आणि त्यांनी तिला याबाबत विचारलं.
सलमानचा ‘सिकंदर’ निघाला फुसका बार! बजेटचा खर्चंही पार करणं पडलं महागात
तेव्हा तमन्नाने वडिलांना सांगितलं की, विजय लग्न करू इच्छित नाहीये. तसंच विजय आता कमिटेड राहिल, असं वाटतं नाही. शिवाय सार्वजनिक ठिकाणी अनेकदा तमन्ना आणि विजय एकत्र स्पॉट झाले होते. त्यामुळे ही ती चिंतेत होती. तिने हे सर्वच विजयच्या सांगण्यानेच केलं आहे. या व्हायरल पोस्टमध्ये असेही सांगण्यात आलं की, टॉलिवूड सुपरस्टार चिरंजीवी यांनी तमन्नाला सल्ला दिला होता की, तू विजयसोबतच्या ब्रेकअपची बातमी माध्यमांना सांग. कारण हे तुझ्यासाठीच चांगलं असेल. पण अद्यापही तमन्नाचं याबाबत कोणतंही विधान समोर आलेलं नाही.
Salman Khan Threat: तारीख तिच, पुन्हा धमकी; सलमान खानचा जीव धोक्यात?
नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या ‘लस्ट स्टोरीज २’ चित्रपटाच्या शुटिंगवेळी तमन्ना आणि विजयची पहिल्यांदा भेट झाली होती. त्यावेळी त्यांची तिथे चांगली मैत्री झाली. दोन वर्षांपूर्वी गोव्यामध्ये झालेल्या न्यू इयर पार्टीला तमन्ना आणि विजय एकत्र दिसले होते. तेव्हापासून त्यांच्या रिलेशनची चर्चा चाहत्यांमध्ये होत आहे. हे कपल अनेकदा पापाराझींच्या कॅमेऱ्यात एकत्र स्पॉटही झाले आहेत. तर काहीवेळा त्यांनी स्वत:च सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे एकत्र फोटोही शेअर केले आहेत. ‘लस्ट स्टोरीज २’ चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी विजय- तमन्नाने प्रेमाची कबुली दिली. पण, मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच दोघांचा ब्रेकअप झाल्याचं समोर आलं. ‘पिंकविला’ने दिलेल्या वृत्तानुसार, विजय- तमन्नाने ब्रेकअपनंतर फ्रेंडशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला आहे. दोघं अजूनही एकमेकांना इन्स्टाग्रामवर फॉलो करत आहेत.