कार्तिकी गायकवाडने अखेर लेकाचा चेहरा दाखवला, अंगाई गीत गात सांगितलं नाव; क्यूट Video Viral
‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ची विजेती कार्तिकी गायकवाड सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. कार्तिकी गेल्या वर्षी १४ मे रोजी आई झाली. तिने गोंडस बाळाला जन्म दिला. तिने गेल्या वर्षीच मुलाला जन्म दिला. आता तिचा मुलगा ११ महिन्यांचा झाला असून आता गायिकेने चाहत्यांना बाळाची पहिली झलक दाखवली असून त्याचं नावंही सांगितलं आहे. कार्तिकीने युट्यूबवर अंगाई गीत गात चाहत्यांना बाळाचं नाव सांगितलं आहे आणि त्याचा चेहराही दाखवला आहे.
सलमानचा ‘सिकंदर’ निघाला फुसका बार! बजेटचा खर्चंही पार करणं पडलं महागात
कार्तिकी गायकवाडने तिच्या युट्यूब चॅनलवर ‘नीज बाळा’ ही अंगाई गीतचा व्हिडिओ रिलीज केला आहे. त्या व्हिडिओमध्ये कार्तिकीने बाळाचा चेहरा दाखवत त्याचं नावही उघड केलं आहे. रिशांक (Rishank) असं कार्तिकीच्या मुलाचं नाव आहे. रिशांक कार्तिकी रोनित पिसे (Rishank Kartiki Ronit Pise) असं स्क्रीनवर लिहून येतं. नंतर कार्तिकी नीज बाळा ही अंगाई गायला सुरुवात करते. तेव्हाच रोनित लेकाला घेऊन येतो. रिशांक ११ महिन्यांचा असून नुकताच चालायला लागला आहे याचीही झलक दिसते. व्हिडिओच्या शेवटी रिशांक कार्तिकीच्या मांडीवर शांत निजलेला दिसतो. आई, वडील आणि लेकाचा हा क्युट व्हिडिओ भावुक करणारा आहे. तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे.
कार्तिकीने काही तासांपूर्वीच इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत, “अखेर प्रतीक्षा संपली… ‘अंगाई-नीज बाळा’ गाणं प्रदर्शित झालं असून… आम्ही यात आमच्या बाळाचा चेहरा रिव्हिल केला आहे.” असं तिने स्टोरीमध्ये आपल्या चाहत्यांना सांगितलं आहे. तसेच या स्टोरीमध्ये गायिकेने अंगाई गीताची युट्यूबची लिंक देखील दिली आहे. ‘कार्तिकी कल्याणजी गायकवाड ऑफिशियल’या चॅनलवर हा अंगाई गीताचा व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे. ‘अंगाई-नीज बाळा’ हे अंगाई गीत कार्तिकीने तिच्या लाडक्या लेकासाठी खास प्रदर्शित केले आहे. या गाण्याची गीतकार, संगीतकार आणि गायिका कार्तिकी गायकवाड स्वतः असून या गाण्याची निर्मिती तिच्या वडिलांनी म्हणजेच कल्याणजी गायकवाड यांनी केली आहे.
Salman Khan Threat: तारीख तिच, पुन्हा धमकी; सलमान खानचा जीव धोक्यात?
‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’च्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या घराघरात लोकप्रिय झालेल्या कार्तिकीने आपल्या गाण्याच्या माध्यमातून आणि आपल्या आवाजाच्या माध्यमातून विशेष लोकप्रियता मिळवली आहे. कार्तिकी गायकवाड मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय गायिकेंपैकी एक आहे. तिने अनेक गाण्यांना आपला आवाज दिला आहे. २०२० साली कार्तिकीने आणि रोनित पिसेने लग्नगाठ बांधली. लग्नाच्या चार वर्षांनंतर ते दोघेही आई- बाबा झाले. गेल्या वर्षी १४ मे रोजी कार्तिकीने रिशांकला जन्म दिला. येत्या १४ मे रोजी रिशांक १ वर्षाचा होणार आहे. त्याआधी कार्तिकीने त्याचा चेहरा चाहत्यांना दाखवला. कार्तिकी लेकाच्या जन्मानंतर लगेच कामावरही रुजु झाली. अनेक ठिकाणी तिच्या गाण्याचे कार्यक्रम होतात.