बिग बॉस-16 (Bigg Boss 16) च्या चाहत्यांना या आठवड्यात खूप वेगळ्या गोष्टी पाहायला मिळणार आहेत. या आठवड्यात बिग बॉस-16 मधील स्पर्धकांना भेटायला त्यांच्या कुटुंबातील सदस्य येणार आहेत. शिव ठाकरेची (Shiv Thakare) आई, एम. सी. स्टॅनची आई आणि साजिद खानची (Sajid Khan) बहीण फराह खान (Farah Khan) बिग बॉसच्या घरात येणार आहे. बिग बॉस-16 चा एक प्रोमो हा सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये फराह खान ही साजिदला बघितल्यानंतर रडताना दिसत आहे.
साजिद खानला सपोर्ट करण्यासाठी त्याची बहीण फराह खान ही बिग बॉसच्या घरात येणार आहे आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, बिग बॉसच्या घरामध्ये फराह जाते आणि भावाला पाहून तिला अश्रू अनावर होतात. यावेळी फराह साजिदला म्हणते, “रडू नकोस, आईला तुझा खूप अभिमान वाटतो.” तर दुसऱ्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, घरातील इतर सदस्यांनादेखील फराह म्हणते, “साजिद, तुला हे लोक भेटले आहेत, त्यामुळे तू खूप लकी आहेस.” अनेक नेटकरी बिग बॉसच्या या आगामी एपिसोडच्या प्रोमोवर कमेंट करत आहेत. कमेंट करुन ते फराह आणि साजिदला ट्रोल करत आहेत. एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की, ‘फराह आणि तिची आई यांना साजिदचा अभिमान का वाटतो? त्यानं काय केलं आहे?’ तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, ‘बिग बॉसमध्ये त्यानी अशी एकही गोष्ट केली नाही, ज्याचा अभिमान वाटेल.’
बिग बॉसच्या घरात रोज काय घडणार याची प्रेक्षकांना नेहमीच उत्सुकता असते. सोमवार ते शुक्रवार रात्री नऊ वाजता बिग बॉस हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येतो. बिग बॉस शोमध्ये शनिवारी आणि रविवारी सलमान खान बिग बॉसच्या घरातील सदस्यांची शाळा घेतो आणि त्यांनी केलेल्या चुकीच्या गोष्टींसाठी त्यांना सुनावतो.