बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भटचा (Alia Bhatt) चित्रपट ‘गंगुबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) २५ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला होता. प्रदर्शित झाल्यानंतर ‘गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटानं कोट्यवधींची कमाई केली होती. आता बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर ‘गंगुबाई काठियावाडी’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवरून (Gangubai Kathiawadi On Netflix) प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
नेटफ्लिक्सनं त्यांच्या अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाचा पोस्टर दिसत आहे. या पोस्टमध्ये लिहिले आहे, ‘देखो चाँद नेटफ्लिक्स पे आ रहा है. गंगुबाई काठियावाडी २६ एप्रिल रोजी होणार प्रदर्शित.’ ज्यांनी हा चित्रपट चित्रपटगृहामध्ये जाऊन नसेल पाहिला ते प्रेक्षक आता नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट पाहू शकणार आहेत.
[read_also content=”युजर्स कमी झाल्याने नेटफ्लिक्सचा मोठा निर्णय, स्वस्त प्लॅन लाँच करण्याच्या हालचाली सुरु https://www.navarashtra.com/entertainment/netflix-to-launch-cheaper-plan-for-subscribers-nrsr-271210/”]
‘गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केले आहे. चित्रपटात आलिया भट शांतनु, आलिया, अजय देवगणस विजय राज, सीमा पाहवा यांनी या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली. ‘गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटाच समंथा, सोफी चौधरी, अनन्या पांडे, आदित्य सील, अनुराग कश्यप आणि नीतू कपूर या कलाकरांनी कौतुक केलं.