Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धोका, प्रेम आणि संघर्षाचा नवा अध्याय, ‘हलगट’ चित्रपटाची रिलीज डेट जाहीर

थरारक आणि हटके कथा घेऊन 'हलगट' नावाचा एक नवा चित्रपट १८ एप्रिल २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट गावाबाहेरच्या एका धोकादायक समुदायाची कथा उलगडतो.

  • By चेतन बोडके
Updated On: Mar 25, 2025 | 06:13 PM
धोका, प्रेम आणि संघर्षाचा नवा अध्याय, 'हलगट' चित्रपटाची रिलीज डेट जाहीर

धोका, प्रेम आणि संघर्षाचा नवा अध्याय, 'हलगट' चित्रपटाची रिलीज डेट जाहीर

Follow Us
Close
Follow Us:

मराठी चित्रपटसृष्टीत वेगळ्या धाटणीच्या कथांची उणीव असताना एक वेगळी, थरारक आणि हटके कथा घेऊन ‘कर्नन फिल्म्स प्रोडक्शन’चा नवा चित्रपट ‘हलगट’ १८ एप्रिल २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट गावाबाहेरच्या एका धोकादायक समुदायाची कथा उलगडतो. या टोळीचा क्रूर प्रमुख आणि त्याच्या विरोधात उभा राहणारा बंडखोर — या संघर्षाच्या छायेत एक नाजूक प्रेमकथा फुलते. लुटीचा खेळ, विश्वासघात, आणि सुटकेच्या प्रयत्नात सगळं काही बदलत जातं. शेवटी जे घडतं ते धक्का देणारं असतं, पण ते खरंच शेवट असतो का, की फक्त एका नव्या प्रवासाची सुरुवात? उत्तर अनुत्तरित राहतं…

संविधानाच्या शक्तीची जाणीव करून देणाऱ्या ‘२६ नोव्हेंबर’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज, क्रांतिकारी चित्रपट केव्हा होणार रिलीज

‘हलगट’ची कथा जितकी जोरदार आहे, तितकंच त्याचं संगीतही प्रेक्षकांच्या मनाला भिडणारं आहे. चित्रपटात वेगवेगळ्या भावनांना उजाळा देणाऱ्या गाण्यांची मालिका आहे. चित्रपटाच्या पार्श्वसंगीतात प्रत्येक दृश्याला अधिक प्रभावी करण्याची ताकद आहे. विशेषतः शेवटच्या दृश्यात पार्श्वसंगीत, अभिनय आणि जिलबीचा धक्कादायक निर्णय या सगळ्याची सांगड प्रेक्षकांच्या मनात खोलवर ठसणार आहे.चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक करण सुमन अर्जुन आहेत. हा चित्रपट कर्नन फिल्म्स प्रोडक्शन अंतर्गत साकारला असून, चित्रपटाचे निर्माते अण्णासाहेब बाबुराव घोंगडे, जीवन माधव लहासे, करण सुमन अर्जुन आणि हेमंत फकिरा अजलसोंडे आहेत.

पुन्हा एकदा सलमानच्या मानवतेची झलक, 200 मुलांच्या हृदयाच्या आरोग्यासाठी भरवले नाशिकमध्ये मोफत शिबीर

चित्रपटात मंगेश रंगनाथ कांगणे, अभिजीत कुलकर्णी, सुप्रिती शिवलकर, आणि अतिश लोहार यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. तसेच, विष्णू घोरपडे, गणेश आवारी, भूषण काटे आणि प्रदीप लडकत यांनी सहनिर्माते म्हणून भूमिका पार पाडली आहे. अभिजीत कुलकर्णी यांनी चित्रपटाची कथा आणि पटकथा लिहिली आहे.

चित्रपटाची संपादन जबाबदारी संतोष घोटोसकर यांनी सांभाळली आहे. वेशभूषा प्रणिता हिंदुराव चिंदगे, तर मेकअप पूजा विश्वकर्मा यांनी केले आहे. जगदीश शेलार हे कला दिग्दर्शक म्हणून कार्यरत आहेत, तर श्री दत्तात्रय मुसळे यांनी चित्रपटाची पब्लिसिटी डिझाईन केली आहे. श्रीनिवास राव यांनी DI कलरिस्ट म्हणून काम पाहिले असून, पार्श्वसंगीताची जबाबदारी अजिंक्य जैन यांनी सांभाळली आहे.

गीतकार पद्माकर मालकापूरे, संगीतकार निलेश पाटील, आणि ध्वनी संयोजन स्वरूप जोशी व पोस्ट प्रोडक्शन लाइन प्रोडूसर जयेश मलकापूरे हे आहे. जीवन लहासे कार्यकारी निर्माता आहेत, तर अक्षय बोराटे यांनी प्रोडक्शन मॅनेजर म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी अमेय आंबेरकर यांनी PR सांभाळला आहे. पोस्ट प्रोडक्शन WOT स्टुडिओ येथे झाले असून, शिवा डिजिटल यांनी सोशल मिडिया मार्केटिंगची जबाबदारी घेतली आहे. चित्रपटाचा वितरण बॉक्सहिट मूव्हीज यांनी केला आहे.

मेलबर्न कॉन्सर्टमध्ये नेहा कक्कर का झाली भावुक ? गायिकेचा Video Viral

चित्रपटाचे दिग्दर्शक करण सुमन अर्जुन यांनी या चित्रपटाबद्दल बोलताना सांगितलं, “हलगट ही केवळ एक कथा नाही, तर समाजातल्या एका दुर्लक्षित वर्गाचं कडवट वास्तव मांडण्याचा हा प्रयत्न आहे. बिबट्या आणि बाब्याच्या संघर्षामध्ये फक्त सत्तेची लढाई नाही, तर त्याच्या मुळाशी माणसाच्या आयुष्याला वळण देणाऱ्या परिस्थितींची लढाई आहे. जिलेबी या पात्राचं ट्विस्ट ही या चित्रपटाची खरी ताकद आहे. प्रेक्षकांनी हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहायलाच हवा.”

Web Title: Halgat marathi movie announced released date out poster on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2025 | 06:13 PM

Topics:  

  • Entertainment News
  • marathi actor
  • marathi actress
  • marathi film
  • Marathi Film Industry

संबंधित बातम्या

तो देवाचा माणूस आहे ! मर्डर, थ्रिल आणि सस्पेन्सने भरलेल्या ‘दशावतार’ चित्रपटचा ट्रेलर अंगावर आणेल काटा
1

तो देवाचा माणूस आहे ! मर्डर, थ्रिल आणि सस्पेन्सने भरलेल्या ‘दशावतार’ चित्रपटचा ट्रेलर अंगावर आणेल काटा

महाराष्ट्राचे ‘भाऊजी’ बांदेकर आता होणार सासरे, सोहम बांदेकर लवकरच ‘या’ अभिनेत्रीसह करणार लग्न
2

महाराष्ट्राचे ‘भाऊजी’ बांदेकर आता होणार सासरे, सोहम बांदेकर लवकरच ‘या’ अभिनेत्रीसह करणार लग्न

‘अवतरली सुंदरा, तेजा’…तेजस्वीचा ‘फ्लोरल साडी लुक’, नजरेनेच चाहते घायाळ
3

‘अवतरली सुंदरा, तेजा’…तेजस्वीचा ‘फ्लोरल साडी लुक’, नजरेनेच चाहते घायाळ

Jyoti Chandekar Passes Away: ‘ठरलं तर मग’फेम ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकरांचे निधन, पुण्यात अखेरचा श्वास
4

Jyoti Chandekar Passes Away: ‘ठरलं तर मग’फेम ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकरांचे निधन, पुण्यात अखेरचा श्वास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.