(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
सर्वात लोकप्रिय काल्पनिक मनोरंजन चॅनेल सोनी बीबीसी अर्थ उल्लेखनीय सिरीज ‘मॅमल्स’चे प्रीमियर सादर करण्यास सज्ज आहे. या सिरीजचे कथन दिग्गज सर डेव्हिड ॲटेनबरो करणार आहेत. २१ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रीमियर सादर होत असलेली ही सहा-भागांची सिरीज सस्तन प्राण्यांच्या असाधारण विश्वाला सादर करते, जेथे ते झपाट्याने बदलत असलेल्या पर्यावरणामधून नेव्हिगेट करण्याचा प्रयत्न करतात. तसेच ही सिरीज या सस्तन प्राण्यांची वैविध्यपूर्ण वागणूक, अनुकूलन आणि आपल्या पर्यावरणामध्ये महत्त्वपूर्ण भूमिकांना प्रकाशझोतात आणते.
सर डेव्हिड ॲटेनबरो यांच्याद्वारे कथन करण्यात येणारी ‘मॅमल्स’ ही सहा-भागांची सिरीज आहे, जी प्रेक्षकांना जगभरातील रोमांचक प्रवासावर घेऊन जाण्यासोबत सस्तन प्राण्यांच्या जीवनामधील अविश्वसनीय विविधतेला दाखवेल. आफ्रिकेमधील भव्य हत्तींपासून हिमालयामधील मायावी बर्फाळ बिबट्यांपर्यंत आणि खोल महासागरापासून बर्फाळ टुंड्रा प्रदेशापर्यंत ही सिरीज लक्षवेधक प्रजातींची ओळख करून देणार आहे. ज्यांची प्रत्येकाची अद्वितीय गाथा आहे. आकर्षक सिनेमॅटोग्राफी प्रेक्षकांना सस्तन प्राण्यांची त्यांच्या पर्यावरणासोबतच्या गुंतागूंतींना दाखवण्यासोबत हे प्राणी सतत बदलत असलेल्या विश्वामध्ये स्वत:चे अस्तित्त्व टिकवून ठेवण्यासाठी त्यांच्या प्रयत्नांना दाखवेल जसे शिकार आणि पिल्लांच्या संगोपनासाठी त्यांना खाऊ घालणे. ॲटेनबरो यांचे कथन कथानकामध्ये रोमांचची भर करते, तसेच या उल्लेखनीय प्राण्यांना परिभाषित करणारी स्थिरता आणि कल्पकतेला प्रकाशझोतात आणते.
प्राणी जगताचे न पाहिलेले अद्भुत विश्व पाहण्यासाठी ‘मॅमल्स’ सिरीज २१ ऑक्टोबर २०२४ पासून दुपारी १२ वाजता आणि रात्री ९ वाजता फक्त सोनी बीबीसी अर्थवर दाखवण्यात येणार आहे. आणि अद्भुत विश्वाचा अनुभव, अस्तित्व, बुद्धी आणि अनुकूलतेला प्राधान्य तुम्हाला अनुभवता येणार आहे.
रॉजर वेब, ‘मॅमल्स’चे कार्यकारी निर्माता याबाबत म्हणाले, ”मी ओरिजिनल ‘लाइफ ऑफ मॅमल्स’ सिरीजचा निस्सीम चाहता होतो, जी २० वर्षांपूर्वी प्रदर्शित करण्यात आली होती आणि तेव्हापासून बरेच बदल झाले आहेत. माझ्या मते, आज सस्तन प्राण्यांबाबत आणि ते आपल्याशी, तसेच जगभरात होत असलेल्या परिवर्तनांशी कशाप्रकारे जुळून घेतात याबाबत सांगण्यासाठी गाथा आहे.’ असे त्यांनी सांगितले.
हे देखील वाचा – Sony BBC Earth : सोनी बीबी अर्थ प्रेक्षकांना देणार सिरीजची मेजवानी! ‘या’ दोन दमदार सिरीजची होणार स्ट्रीमिंग!
पुढे ते म्हणाले, ‘एपिसोड्सच्या माध्यमातून आम्ही कोणत्याही स्थितीचा आणि पर्यावरणीय स्थितीचा सामना करण्यासाठी ही अनुकूलता आणि क्षमतेला एक्स्प्लोअर केले आहे. यामधून निदर्शनास येते की सस्तन प्राणी पृथ्वीवरील सर्वात थंड आणि सर्वात उष्ण प्रदेशांमध्ये जगू शकतात, तसेच ते महासागरामध्ये खोलवर जाऊ शकतात. त्या सर्वांचे पैलू आणि बाबी समान आहेत, जे त्यांना सस्तन प्राणी बनवतात. पण ते एकत्र आल्यास सर्वात अविश्वसनीय गोष्टी करू शकतात. या सिरीजचे कथन करण्यासाठी सर डेव्हिड ॲटेनबरो असल्याने आम्हाला खूप आनंद मिळेल. ते कथाकथनामध्ये मास्टर आहेत. आज सस्तन प्राणी कशाप्रकारे यशस्वी ठरले आहेत याचे ते स्पष्टीकरण देतील.” असे त्यांनी सांगितले.