(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)
दिवस लहान तर रात्र मोठी होण्यासह हवेमध्ये गारवा पसरत असताना सप्टेंबर महिना नवीन शुभारंभ आणि नवीन पैलूंचा सीझन घेऊन येत आहे. या महिन्यामध्ये, सोनी बीबीसी अर्थ आपल्या पृथ्वीवरील वन्यजीवन आणि महासागरांच्या रहस्यमय सखोलतेला सादर करणाऱ्या विशेष प्रीमियर्सच्या लाइन-अपसह असाधारण साहसी प्रवासाला सुरूवात करत आहे. प्रेक्षक २ सप्टेंबर २०२४ रोजी प्रीमियर होणारी सिरीज ‘बेन फोगल: रिटर्न टू द वाइल्ड’चे आकर्षक व्हिज्युअल्स आणि १६ सप्टेंबर २०२४ रोजी रीलीज होणारी सिरीज ‘डेडली मिशन शार्क’च्या लक्षवेधक कथानकासह अचंबित होतील.
‘बेन फोगल: रिटर्न टू द वाइल्ड’ आपल्या सीझन ३ सह पुनरागमन करत आहे. या लक्षवेधक सिरीजमध्ये अॅडव्हेंचरर बेन फोगल निसर्गाच्या सान्निध्यात जाण्याच्या प्रयत्नामध्ये समकालीन जीवनशैलीचा त्याग करण्याचे धाडस दाखवलेल्या व्यक्तींना पुन्हा भेटणार आहे. नॉर्वेच्या दुर्गम बेटांपासून सहाराच्या निर्जन वाळूकामय प्रदेशापर्यंत बेन या शूरवीरांनी जंगलातील नवीन जीवनाच्या आव्हानांशी कशाप्रकारे जुळवून घेतले याचा उलगडा यामध्ये होणार आहे. ही सिरीज मानवी उत्साह आणि वन्य जीवन कितीही आव्हानात्मक असले तरी स्वप्ने साकारण्याच्या प्रयत्नांना सादर करणार आहे.
हे देखील वाचा- सोनी बीबीसी अर्थच्या थरारक मे प्रिमियर्सच्या साथीने उन्हाळी मोसमातील भटकंतीसाठी सज्ज व्हा
या साहसी सिरीजसोबत थरारक सिरीज ‘डेडली मिशन शार्क’ देखील सादर करण्यात येणार आहे, जेथे निसर्गवादी स्टीव्ह बॅकशेल दहा तरूण एक्स्प्लोरर्सना अल्टिमेट सागरी मिशनवर घेऊन जातात. बहामासच्या आकर्षक पार्श्वभूमीमध्ये स्थित हे तरूण ट्रेलब्लेझर्स महासागरातील काही सर्वात भयंकर शिकारींचा समोरासमोर सामना करण्याचे रोमहर्षक व आव्हानात्मक टास्क पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. ओपन-ओशियन डाइव्ह्ज आणि प्रत्यक्ष पर्यावरणीय प्रकल्पांच्या माध्यमातून ही सिरीज महासागर योद्धांच्या भावी पिढीने नक्की पाहिली पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टीचा अनुभव त्यांनी घेतला पाहिजे.
‘बेन फोगल: रिटर्न टू द वाइल्ड’ येत्या २ सप्टेंबरपासून सुरु होणार असून, ‘डेडली मिशन शार्क’ १६ सप्टेंबरपासून सोनी बीबीसी अर्थवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.