न्यासा देवगण-आरव कुमार : बॉलीवूड स्टार किड्समधील मैत्री ही काही नवीन गोष्ट नाही. सारा अली खान आणि जान्हवी कपूर ते अनन्या पांडेपर्यंत अनेक बॉलीवूड अभिनेत्री आणि अभिनेत्यांचे पक्के मित्र मैत्रिणी झाले आहेत. नुकतेच काही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये काजोल (Kajol) आणि अजय देवगणची (Ajay Devgan) मुलगी न्यासा देवगण (Nysa Devgan) आणि सुपरस्टार अक्षय कुमारचा (Akshay Kumar) मुलगा आरव कुमार (Aarav Kumar) यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सध्या या दोघांच्या मैत्रीची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
अक्षय कुमारचा मुलगा आरव कुमार लाइमलाइटपासून दूर राहतो, तर दुसरीकडे, काजोलची मुलगी न्यासा देवगन अनेकदा आउटिंग आणि पार्ट्यांमुळे चर्चेत असते. नीसा आणि आरवच्या मैत्रीची फार कमी चर्चा होते कारण ते क्वचितच एकत्र दिसतात. पण काही दिवसांपूर्वी नीसा आणि आरवला एकत्र पाहिल्यानंतर लोकांचा असा विश्वास वाटू लागला होता की दोघेही चांगले मित्र आहेत. एकत्र डिनर केल्यानंतर नीसा आणि आरव आता युरोपमधील एका क्लबमध्ये पार्टी करताना दिसले.
ओरी हा नेहमीचे मोठ्या बॉलीवूड सेलिब्रेटींच्या आयोजित पार्ट्यांमध्ये जात असतो. पार्टी झाल्यानंतर तो त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटला सुद्धा त्या पार्ट्यांचे फोटो टाकत असतो. सेलिब्रेटींसोबत पार्टी करण्यासाठी प्रसिद्ध असलेला ओरी अनेकदा आतील फोटोंसह चाहत्यांना आश्चर्यचकित करतो. पुन्हा एकदा त्याने असेच काहीसे केले आहे. ओरीने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो नीसा देवगण आणि आरव कुमारसोबत पार्टी करताना दिसत आहे.
फोटोमध्ये नीसा देवगन काळ्या रंगाच्या चमकदार स्ट्रॅपी ड्रेसमध्ये ग्लॅमरस दिसत आहे. केशरी ओठ, चकचकीत मेकअप आणि खुल्या केसांनी या स्टार किडने तिची लूक सुंदर बनवली आहे. तर, आरव काळ्या बो टायसह पांढऱ्या शर्टमध्ये सुंदर दिसत आहे. आरवकडे पाहून लोक त्याला ज्युनियर खेळाडू म्हणू लागले आहेत.