Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमृता सुभाष- अनिता दातेच्या ‘जारण’ ची बॉक्स ऑफिसवर किमया, तीन आठवड्यांत सहा कोटींहून अधिकची कमाई

मराठी चित्रपट ‘जारण’ने रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करत केवळ समीक्षक, चित्रपटसृष्टी नव्हे, तर सर्वसामान्य प्रेक्षकांकडूनही भरभरून प्रेम मिळवले आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Jun 29, 2025 | 02:54 PM
अमृता सुभाष- अनिता दातेच्या 'जारण' ची बॉक्स ऑफिसवर किमया, तीन आठवड्यांत सहा कोटींहून अधिकची कमाई

अमृता सुभाष- अनिता दातेच्या 'जारण' ची बॉक्स ऑफिसवर किमया, तीन आठवड्यांत सहा कोटींहून अधिकची कमाई

Follow Us
Close
Follow Us:

मराठी चित्रपट ‘जारण’ने रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करत केवळ समीक्षक, चित्रपटसृष्टी नव्हे, तर सर्वसामान्य प्रेक्षकांकडूनही भरभरून प्रेम मिळवले आहे. अनेक मोठ्या हिंदी चित्रपटांच्या स्पर्धेतही ‘जारण’ने आपल्या वेगळ्या आशयामुळे चित्रपटगृहात आपली खास जागा निर्माण केली आहे. प्रदर्शित होऊन तीन आठवडे उलटले असतानाच ‘जारण’ने सुमारे ६ कोटींच्या वर कमाई केली आहे. हा प्रवास केवळ आकड्यांपुरता मर्यादित न राहता, भावनिक गुंतवणूक, आशयघन कथा आणि प्रेक्षकांकडून तोंडभरून कौतुक या सगळ्यांचा एकत्रित मिलाफ आहे.

चित्रपटाला मिळणाऱ्या सकारात्मक प्रतिसादामुळे ‘जारण’चे शोजही अनेक ठिकाणी वाढवण्यात आले. या यशाच्या पार्श्वभूमीवर नुकतेच एका भव्य सक्सेस पार्टीचं आयोजन करण्यात आले. यामध्ये ‘जारण’ची संपूर्ण टीम, निर्माते, कलाकार मंडळी यांच्यासह चित्रपटसृष्टीतील काही मान्यवरांनी उपस्थिती लावली.

“…पण माझ्या माय मराठीचा अपमान खपवून घेणार नाही”; हिंदी भाषेच्या सक्तीवरून प्रसिद्ध गायकाची खोचक पोस्ट

या वेळी दिग्दर्शक हृषीकेश गुप्ते म्हणतात, ” ‘जारण’ सारखा सिनेमा बनवणे हे स्वप्न होते आणि आज जेव्हा प्रेक्षक त्या स्वप्नाशी स्वतःला जोडतात, तेव्हा एक निर्मिती फक्त प्रकल्प न राहाता एक भावनिक बंध जुळले जातात. प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांनी आम्हाला नव्याने ऊर्जा दिली आहे. या चित्रपटामध्ये हृदयस्पर्शी कथा आणि परिश्रमांची गुंफण आहे. यशाच्या या टप्प्यावर पोहोचताना आमच्या संपूर्ण टीमने ज्या श्रद्धेने काम केले, ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचल्याचे आज सिद्ध झाले आहे.”

 

निर्माते अमोल भगत यांनी यशाबद्दल प्रतिक्रिया देताना म्हटले, ”  ‘जारण’ सारखा आशयघन सिनेमा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवताना आम्हाला प्रचंड आत्मिक समाधान मिळत आहे. हे यश म्हणजे आमच्यावर असलेल्या विश्वासाची पोचपावती आहे. प्रेक्षकांसाठी अशाच आशयप्रधान, अर्थपूर्ण आणि भावनिक कथा घेऊन आम्ही नक्कीच येऊ.”

उदित नारायण यांच्या Kissing Controversy वर त्यांच्या लेकाची प्रतिक्रिया; म्हणाला, “तसं कृत्य मी केलं…”

अनिस बाझमी प्रॉडक्शन्स प्रस्तुत, ए अँड एन सिनेमाज एलएलपी यांच्या सहयोगाने आणि एथ्री इव्हेंट्स अँड मिडिया सर्व्हिसेस निर्मित ‘जारण’ चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन हृषीकेश गुप्ते यांनी केलं आहे. तर निर्मितीची जबाबदारी अमोल भगत आणि नितीन भालचंद्र कुलकर्णी यांनी सांभाळली असून मनन दानिया सहनिर्माता आहेत. या चित्रपटात अमृता सुभाष व अनिता दाते यांच्यासह किशोर कदम, ज्योती माळशे, विक्रम गायकवाड, राजन भिसे, अवनी जोशी आणि सीमा देशमुख यांचा दमदार अभिनय अनुभवायला मिळतो.

Web Title: Jaran movie earn 6 crore on box office in three weeks actors throw success party

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2025 | 02:54 PM

Topics:  

  • Marathi News

संबंधित बातम्या

Latur Amit Deshmukh : महानगरपालिकेत भाजपाने केलेला कारभार हा भ्रष्टाचाराने बरबटलेला – अमित देशमुख
1

Latur Amit Deshmukh : महानगरपालिकेत भाजपाने केलेला कारभार हा भ्रष्टाचाराने बरबटलेला – अमित देशमुख

Kolhapur News : RTO मार्फत रस्ता सुरक्षा अभियान; बॅनर्स, माहितीपत्रक, भित्तीपत्रके करणार प्रदर्शित
2

Kolhapur News : RTO मार्फत रस्ता सुरक्षा अभियान; बॅनर्स, माहितीपत्रक, भित्तीपत्रके करणार प्रदर्शित

Kolhapur News : नाट्यप्रेमींसाठी पर्वणी ; सामाजिकआशयाच्या एकांकिकांनी रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध
3

Kolhapur News : नाट्यप्रेमींसाठी पर्वणी ; सामाजिकआशयाच्या एकांकिकांनी रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध

Akhil Bhartiy Marathi sahitya Sanmelan: अमेरिकेच्या खासदारांना साहित्य संमेलनाची भुरळ;  श्रीनिवास ठाणेदारांचं मराठीशी खास नातं
4

Akhil Bhartiy Marathi sahitya Sanmelan: अमेरिकेच्या खासदारांना साहित्य संमेलनाची भुरळ; श्रीनिवास ठाणेदारांचं मराठीशी खास नातं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.