Hindi Language Compulsory Utkarsh Shinde Shared Post And Support Mns Marathi Bhasha Morcha
गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये राज्य मंडळाच्या शाळेमध्ये इयत्ता पहिलीपासूनच्या विद्यार्थांना तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषेचा पर्याय देण्याच्या निर्णयावरुन सध्या घमासान सुरु आहे. राज्य मंडळाच्या या शिक्षण धोरणाला राज्यातील जनता, विरोधी पक्षातले नेते आणि कलाकार मंडळी विरोध करताना दिसत आहेत. सरकारने पूर्वी हिंदी भाषा विद्यार्थ्यांना शिकवणं अनिवार्य केलं होतं. पण, त्यानंतर जनतेच्या विरोधानंतर सरकारने हिंदी भाषा शिकवण्याची अनिवार्यता हटवली आहे. हिंदी भाषेच्या अनिवार्यतेला सेलिब्रिटींकडूनही ठाम विरोध केला जात आहे.
केदार शिंदें, मकरंद अनासपुरे, हेमंत ढोमे, सयाजी शिंदे, किरण माने या कलाकारांनी त्यांच्या भूमिका मांडत पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. आता या दरम्यान, गायक उत्कर्ष शिंदेनेही हिंदी भाषेच्या सक्तीवर प्रतिक्रिया दिली आहे. त्याने आपली ठाम भूमिका पोस्टच्या माध्यमातून मांडली आहे. त्याची इन्स्टाग्राम पोस्ट सध्या कमालीची चर्चेत आली आहे. एक फोटो आहे, त्यामध्ये एक शाळकरी विद्यार्थी म्हणतो की, ” “तुम्हाऱ्या भाषेचा सन्मान मी करेनच, …पण माझ्या माय मराठीचा अपमान खपवून घेणार नाही.”
“ठेच लागल्यावर ‘आई गं’ म्हणायचं की….” दिग्दर्शक केदार शिंदे यांची सरकारसाठी उपरोधिक पोस्ट
गायक उत्कर्ष शिंदेने पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “ज्ञानाची भक्ती करायची असते सक्ती नाही… मराठी माणूस अन्य अमराठी भाषेचा सन्मान करतो, म्हणजे माय मराठीचा अपमान सहन करेल या भ्रमात राहू नका. आपल्या घरी आलेल्या पाहुण्याने पाहुणचार घ्यावा, घराचा मालक होण्याचा प्रयत्न करू नये. हाच महाराष्ट्र हीच मराठी अस्मिता घेऊन अटकपर्यंत पोहोचला होता. मराठीचा इतिहास पुन्हा एकदा वाचून घ्या.” या पोस्टसह उत्कर्षने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला टॅग केलं आहे. तसंच मोर्चा आणि फुल्ल सपोर्ट असे हॅशटॅगही लिहिले आहेत.
शेफाली जरीवालाच्या मृत्यूचं गुढ उकललं? डॉक्टरांनी सांगितलं कारण
बिग बॉस मराठी ३ फेम आणि गायक उत्कर्ष शिंदे याने शेअर केलेल्या पोस्टवर अनेक युजर्सने “फक्त मराठी”, “अगदी खरं बोललात भाऊ”, “महाराष्ट्रात फक्त मराठी आणि मराठीच” अशा अनेक कमेंट्स करत त्याला पाठींबा दिला आहे. उत्कर्षबद्दल बोलायचं झालं तर तो एक गायक, संगीतकार आणि गीतकार असून त्याला ‘बिग बॉस मराठी ३’ या लोकप्रिय शोमध्ये त्याने सहभाग घेतला होता. या शोच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या घराघरांत प्रसिद्धी मिळाली आहे.