Aditya Narayan says father Udit Narayan comes from a different generation amid kissing controversy
बॉलिवूडचे लोकप्रिय गायक उदित नारायण यांनी आपल्या गाण्यांच्या माध्यमातून लाखो चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून उदित नारायण बॉलिवूडमध्ये सक्रिय आहेत. आज त्यांचा आवाज स्वत:ची ओळख आहे. कायमच गाण्यांमुळे चर्चेत राहणारे उदित नारायण काही महिन्यांपूर्वी एका व्हिडिओमुळे प्रचंड चर्चेत आले होते. एका लाईव्ह शो दरम्यान त्यांनी एक महिला फॅनला लिप किस केला होता. त्यानंतर, गायकाला सोशल मीडियावर तुफान ट्रोल करण्यात आलं होतं. आता या प्रकरणावर गायक उदित नारायण यांचा मुलगा आणि गायक आदित नारायणने प्रतिक्रिया दिली आहे. वडिलांसोबतच्या वादावर आदित्य उघडपणे बोलला आहे.
“ठेच लागल्यावर ‘आई गं’ म्हणायचं की….” दिग्दर्शक केदार शिंदे यांची सरकारसाठी उपरोधिक पोस्ट
‘द इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत गायक आदित्य नारायणने सांगितलं की, जेव्हा माझ्या वडिलांसोबत हा वाद जेव्हा झाला, तेव्हा मला लोकांचा राग समजला नाही. ते अशा काळापासून येत आहेत, जेव्हा एखादा चाहता तुम्हाला खूप सारं प्रेम देतो. जर तुम्ही त्याला त्या बदल्यात प्रेम दिले तर ते चुकीचे मानले जात नाही. आदित्य असेही म्हणतो की, उदित नारायणला संमती म्हणजे काय हे माहित नव्हते. पण आता त्यांना सर्व माहिती आहे.
‘स्क्रीन’सोबत झालेल्या संभाषणात गायक म्हणाले की, “इंटरनेट ही एक विचित्र गोष्ट आहे. सोशल मीडिया हे खरं ठिकाण नाही. तुम्ही इथे जे काही पाहता ते संपूर्ण सत्य नाही. एक सार्वजनिक व्यक्तिरेखा असल्याने, जगात काय घडत आहे यावर आमचे कोणतेही नियंत्रण नाही. सुरुवातीला, वडिलांना का ट्रोल केलं जात आहे, हे समजलं नाही. ते वेगळ्या काळातून आणि विचारसरणीतून आले आहेत. त्यांच्या काळात चाहते स्टेजवर कलाकारांवर त्यांचे अंतर्वस्त्र फेकायचे.”
शेफाली जरीवालाच्या मृत्यूचं गुढ उकललं? डॉक्टरांनी सांगितलं कारण
“आता तुम्ही ते करू शकत नाही. त्याचप्रमाणे, ते अशा काळातून आले आहेत, जेव्हा एखादा चाहता तुम्हाला प्रेम देतो, तर तुम्हाला त्याच्यावर प्रेम करणे चुकीचे वाटत नाही. पण आता सुदैवाने आपण अशा काळात राहतो जिथे संमती नावाची गोष्ट आहे. त्याला याबद्दल काहीच कल्पना नव्हती. हे छान आहे पण ते एक नवीन विकास आहे. आता, वयानुसार गोष्टी सांगितल्या जात आहेत. कदाचित मी ते केले असते आणि ती जर 32 वर्षांची मुलगी असती तर ते इतके मोठे प्रकरण झाले नसते.”
आदित्य नारायण पुढे म्हणतात की, “जेव्हा त्याच्या वडिलांना काही समजत नाही तेव्हा ते त्याला शिकवतात आणि समजावून सांगतात. आदित्यने आपल्या वडिलांना समजावून सांगितले की ते एक सेलिब्रिटी आहे. जर ते काहीही करतात तर ते लगेच लोकांच्या लक्षात येते. आदित्य म्हणाला, “वडील संगीत उद्योगातील एक वरिष्ठ आहेत आणि त्यांचे चाहते ६- ६० वयोगटातील आहेत. त्यामुळे ही घटना कोणासोबत घडत आहे यावर ते अवलंबून आहे. त्यांना संमती म्हणजे काय हे माहित नव्हते.”
“ते त्या पिढीतून आलेले नाहीत. ते असे लोक आहेत जे कधीही चूक करू इच्छित नाहीत. मी त्यांच्यासाठी आहे. जेव्हा त्यांना काही समजत नाही तेव्हा मी त्यांना ते समजावून सांगतो. आता त्यांना कळते की संमती नावाची एक गोष्ट असते. मी त्यांना फक्त एकच गोष्ट समजावून सांगितली की तुम्ही एक सार्वजनिक व्यक्ती आहात. कोणी तुमच्यावर कसे प्रेम करतो हे कधीही बातम्यांमध्ये येणार नाही. पण तुम्ही त्याच्या प्रेमाला कसा प्रतिसाद देता हे खूप महत्वाचे आहे कारण तुम्ही एक आदर्श आहात.”