कास्टिंग दिग्दर्शक मुकेश छाबरा : शाहरुख खानचा जवान चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे. या चित्रपटाने जगभरामध्ये ५०० कोटींचा गल्ला तर नक्कीच जमवला आहे. जवानच्या सुपर सक्सेसनंतर त्याच्या इंटरेस्टिंग कास्टिंगची बरीच चर्चा होत आहे. या चित्रपटात साऊथ आणि बॉलीवूडचे कलाकार पाहायला मिळाले. एकीकडे शाहरुख खानसारखा सुपरस्टार आहे तर दुसरीकडे त्याच्यासोबत साउथ सेन्सेशन नयनताराच्या नव्या जोडीने प्रेक्षकांना आकर्षित केले आहे. याचे सर्व श्रेय कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबरा यांना जाते. या भेटीत मुकेश यांनी सांगितले की, या कास्टिंगसाठी त्यांना एक वर्षाहून अधिक काळ लागला असे सांगितले.
मुकेश छाबरा याने त्याच्या मुलाखतीमध्ये सांगितलं की, या चित्रपटाच्या कास्टिंगच्या बाबतीत त्यांच्यावर खूप दबाव होता. या मेगा प्रोजेक्टबाबतीत बऱ्याच लोकांना अनेक अपेक्षा होत्या. जेव्हा असे मोठे प्रकल्प येतात तेव्हा जबाबदाऱ्या वाढतात. या चित्रपटाच्या कास्टिंगमध्ये बरेच लोक आहेत. अशा चित्रपटांना खूप वेळ लागतो. दुसरीकडे, ऍटली मध्ये पहिल्यांदाच बॉलिवूड प्रोजेक्ट बनवत होता. त्याचं काम करण्याची शैली खूप वेगळी आहे. विशेषत: मला त्याची शैली माहीत नव्हती. मलाही त्यांना समजायला वेळ लागला. गेल्या काही वर्षांत मी राज कुमार हिरानी, इम्तियाज, हंसल मेहता अशा विविध प्रकारच्या दिग्दर्शकांसोबत काम केले आहे असे मुकेश छाबरा म्हणाले.
मुकेश पुढे सांगतात की, आपण ज्यांच्यासोबत पहिल्यांदा काम करत असतो, त्यावेळी समोरच्याला सुद्धा वेळ लागतो. माझ्या पहिल्या भेटीनंतर, मी काही चित्रपट संदर्भ म्हणून पाहिले जेणेकरून मला समजेल. मात्र, या पाच मुलींचा शोध घेणे ही हे माझ्यासाठी मोठं चॅलेंज होतं. या चित्रपटामध्ये मला दक्षिण आणि उत्तरेकडील कलाकाराना सोबत घ्यायचं होतं. जवान या चित्रपटासाठी मला आम्हाला त्या पाच मुलींच्या संघाचा समतोल साधावा लागला. सुनील ग्रोव्हरसारख्या कलाकारांना निवडून एकत्र आणणे ही मोठी जबाबदारी होती. मला आनंद आहे की कास्टिंगबद्दलच्या पुनरावलोकनांमध्ये चांगल्या गोष्टी येत आहेत असे मुकेश छाबरा म्हणाले.