फोटो सौजन्य: Gemini
दुचाकी चालवताना स्वतःच्या सुरक्षेसाठी अनेक जण उत्तम Helmet वापरत असतात. मात्र, काही जण निकृष्ट दर्जाचे हेल्मट वापरतात. खरंतर, भारतात दरमहा लाखो रस्ते अपघात होतात, त्यापैकी बहुतेक अपघात दुचाकी वाहनांमुळे होतात. हेल्मेट न घालणे हे यामागील एक प्रमुख कारण आहे. स्टीलबर्ड हेल्मेट उत्पादक कंपनी Ignyte ने एक नवीन हेल्मेट, आयजीएन-16 लाँच केले आहे. चला या हेल्मेटच्या सेफ्टी, फीचर्स आणि किंमत याबद्दल जाणून घेऊयात.
हेल्मेट उत्पादक स्टीलबर्डने भारतीय बाजारात Ignyte IGN-16 हे प्रीमियम हेल्मेट लाँच केले आहे. या नवीन हेल्मेटमध्ये रेट्रो-प्रेरित डिझाइन आणि हाफ-फेस हेल्मेट आहे. कंपनीचा दावा आहे की या हेल्मेटमध्ये केवलर रीइन्फोर्समेंट आहे, ज्यामुळे ते सर्वात सुरक्षित हेल्मेटपैकी एक बनते.
इग्नाइटचे डायरेक्टर कशिश कपूर म्हणाले की, IGN-16 मॉडेलमध्ये दिलेले EPP मल्टी-इम्पॅक्ट प्रोटेक्शन आणि केव्हलार रिइनफोर्समेंट यांचे संयोजन रायडर्सला अधिक आत्मविश्वास, सुरक्षा आणि आराम देते. हे मॉडेल सुरक्षितता आणि प्रीमियम डिझाइनबाबत IGNYTE ची वचनबद्धता स्पष्टपणे दर्शवते.
TVS Raider 125 की Pulsar NS125, पॉवर, फीचर्स आणि किमतीच्या बाबतीत कोणती बाईक सुसाट?
स्टीलबर्डच्या प्रीमियम ब्रँड इग्नाइटच्या नवीन IGN-16 हेल्मेटमध्ये PC-ABS शेल आणि EPP लाइनर देण्यात आला आहे. या तंत्रज्ञानामुळे हेल्मेटवर येणारे आघात सहज शोषले जातात आणि हेल्मेट पुन्हा आपल्या मूळ आकारात येते, ज्यामुळे दीर्घकाळ मल्टी-इम्पॅक्ट प्रोटेक्शन मिळते.
हेल्मेटच्या आतील भागात अँटीमायक्रोबियल, अँटी-एलर्जिक आणि ब्रीदेबल फॅब्रिक वापरले आहे, ज्याची पॅडिंग काढता येण्याजोगी आणि धुतली जाणारी आहे.
हेल्मेटमध्ये अँटी-स्क्रॅच UV-प्रोटेक्टेड पॉलीकार्ब वायझर आणि Pinlock 30 अँटी-फॉग इनसर्ट दिले आहेत. तसेच यामध्ये Double D-Ring आणि Micrometric Buckle हे दोन्ही पर्याय देखील उपलब्ध आहेत.
हे मॉडेल ISI (IS 4151:2015) + DOT (FMVSS 218 USA) या दुहेरी सर्टिफिकेशनसह बाजारात आणले गेले आहे.
IGN-16 हेल्मेट 540 ते 620 मिमी या साइजमध्ये लाँच करण्यात आला आहे. याची किंमत 5,999 रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनीकडून हेल्मेटवर 3 वर्षांची वॉरंटी दिली जात आहे.






