IIM Ranchi ठरले कमिन्स इंडियाच्या 'रिडिफाइन २०२५' चे चॅम्पियन!
भारत: कमिन्स इन इंडिया (‘कमिन्स इंडिया’) या आघाडीच्या ऊर्जा तंत्रज्ञान प्रदाता कंपनीने आपली प्रतिष्ठित वार्षिक बी-स्कूल केस स्टडी कॉम्पीटिशन ‘रिडिफाइन २०२५’च्या आठव्या पर्वाची यशस्वीरित्या सांगता केली. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, रांची मधील टीम क्रो चॅम्पियन ठरली, जिला प्रतिष्ठित विजेता ट्रॉफी आणि रोख बक्षीसासह सन्मानित करण्यात आले, तर इंडियन स्कूल ऑफ बिझनेस, मोहाली मधील टीम व्हिजनीअर्स उपविजेती ठरली.
यंदा स्पर्धेची थीम ‘फ्रॉम बॅकअप टू बॅकबोन
ड्रायव्हिंग द एनर्जी शिफ्ट’ म्हणजेच ‘बॅकअपपासून आधारस्तंभापर्यंत: ऊर्जा परिवर्तनाला गती’ने सहभागींना नाविन्यपूर्ण व शाश्वत मॉडेल्स शोधण्यास प्रेरित केले, जे ऊर्जा मूल्य साखळीमधील महत्त्वपूर्ण आव्हानांचे निराकरण करतात. ही स्पर्धा विद्यार्थ्यांना विचार व सहयोगाचे देवाणघेवाण करण्याची संधी देते. यंदा या स्पर्धेमध्ये देशभरातील १९ प्रमुख बी-स्कूल्समधील २१५१ टीम्समधील ६४५३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्पर्धेतील विविध फेऱ्यांनंतर सहा अंतिम टीम्सनी पुणे येथील कमिन्स इंडिया ऑफिस कॅम्पसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ग्रॅण्ड फिनालेकडे वाटचाल केली.
दोन-दिवसीय फिनालेमध्ये संपन्न अध्ययन अनुभव मिळाला, ज्यामध्ये सर्वसमावेशक नेतृत्व सत्रे, नेटवर्किंग संधी आणि कमिन्स टेक्निकल सेंटर इंडिया (सीटीसीआय) व कोथरूड इंजिन प्लाण्ट (केईपी)चे मार्गदर्शित दौरे यांचा समावेश होता. ज्युरीद्वारे मूल्यांकन आणि कर्मचाऱ्यांच्या थेट मतदान सत्रासह या कार्यक्रमाची सांगता झाली. मुख्य स्पर्धेव्यतिरिक्त, सर्व अंतिम टीम्सनी खास सोशल मीडिया कॉन्टेस्ट मध्ये सहभाग घेतला. त्यांनी लहान, सर्वसमावेशक टीमची ओळख करून देणारे व्हिडिओ तयार केले, जे लिंक्डइनवर अपलोड करण्यात आले. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, रांची मधील टीम क्रो ने त्यांच्या व्हिडिओसाठी सर्वोच्च सहभाग मिळवला आणि त्यांना कॉन्टेस्टचे विजेते घोषित करण्यात आले.
विजेत्यांचे अभिनंदन करत कमिन्स इंडियाच्या ह्युमन रिसोर्सेस लीडर अनुपमा कौल म्हणाल्या, “रिडिफाइन पारंपारिक गोष्टींना आव्हान करणाऱ्या आणि मर्यादेपलीकडे विचार करणाऱ्या तरूण विचारवंतांच्या क्षमतेला प्रशंसित करते. मला सहभागींनी दाखवलेले टॅलेंट, सर्जनशीलता आणि समस्या निराकरण करण्याच्या उत्साहाचा अभिमान वाटतो. त्यांच्या संकल्पना धाडसी, व्यावहारिक आहेत आणि उद्देश व जबाबदारीमध्ये रूजलेल्या आहेत. हे तरूण परिवर्तनकर्ते उल्लेखनीय हेतू व नाविन्यतेसह वास्तविक विश्वातील ऊर्जा आव्हानांचे निराकरण करत असल्याचे पाहून प्रेरणादायी वाटत आहे. भावी पिढीच्या प्रतिभेला सक्षम करणे हे अधिक शाश्वत आणि सक्षम भविष्यासाठी कमिन्स इंडियाच्या वचनबद्धतेचा एक भाग आहे.”
कमिन्स इंडियाचे चीफ स्ट्रॅटेजी ऑफिसर सुब्रमण्यम चिदंबरन म्हणाले, “दरवर्षी, रिडिफाइन भावी पिढी शैक्षणिक उत्कृष्टतेसह वास्तविक विश्वातील आव्हानांचे कशाप्रकारे निराकरण करू शकते याचा अनुभव देते. यंदा, सहभागींनी उल्लेखनीय धोरणात्मक विचारसरणी आणि स्थिर, भविष्याकरिता सुसज्ज व्यवसाय मॉडेल निर्माण करण्याबाबत समज दर्शवली. आम्ही विशेषत: नाविन्यतेसह व्यावहारिक दृष्टिकोन एकत्रित करण्याच्या त्यांच्या क्षमतेने प्रभावित झालो. सर्व विजेत्या टीम्सचे आणि सहभागींचे त्यांचे अविश्वसनीय प्रयत्न व उल्लेखनीय कामगिरीसाठी अभिनंदन.”
कमिन्स इंडिया प्रमुखांच्या प्रतिष्ठित ज्युरी पॅनेलमध्ये एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर – इंजीनिअरिंग व चीफ टेक्निकल ऑफिसर श्रीनिवास राघवन, पॉवर जनरेशन बिझनेस लीडर जेमसन मेंडोन्का आणि पॉवर सिस्टम्स बिझनेस युनिटच्या स्ट्रॅटेजी, प्रोडक्ट प्लॅनिंग अँड डिजिटलचे डायरेक्टर सचिन सिमांत यांचा समावेश होता, ज्यांनी अंतिम स्पर्धकांच्या सादरीकरणांचे मूल्यांकन केले.
ग्रॅण्ड फिनालेकडे वाटचाल करत कमिन्स इंडियाने परस्परसंवादात्मक नेतृत्व सत्रे व प्रश्नमंजुषांचे आयोजन कले, ज्यामुळे सहभागींना कंपनीचे ध्येय, दृष्टिकोन आणि सर्वसमावेशक ऊर्जा क्षेत्र समजून घेण्यास आणि तयार करण्यास मदत झाली.
SAIL Jobs 2025: स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया मध्ये भरती, 1.80 लाखांपर्यंत पगार, तात्काळ करा अर्ज
ग्रॅण्ड फिनालेमध्ये स्पर्धा केलेल्या सहा अंतिम टीम्स पुढीलप्रमाणे:
1. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड, दिल्ली मधील जीएएसएक्स३
2. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम), शिलॉंग मधील डायनॅमिक ड्रिमर्स
3. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम), रांची मधील क्रो
4. इंडियन स्कूल ऑफ बिझनेस, मोहाली मधील व्हिजनीअर्स
5. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम), तिरूचिराप्पलीमधील टीम ७
6. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम), लखनौ मधील निंजा टर्टल्स






