‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही मालिका गेल्या 15 वर्षांपासून चाहत्यांचं मनोरंजन करतेय. मालिका तर लोकप्रिय आहेच पण मालिकेत भूमिका साकारणाऱ्या कलाकारांची देखील सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फालोइंग बघायला मिळते.
या मालिकेत जेठालालचे (Jethalal) पात्र साकारणारे दिलीप जोशी हे कायमच चर्चेत असतात. दिलीप जोशी यांचा चाहता वर्ग मोठा आहे. मात्र, दिलीप जोशी (Dilip Joshi) हे सोशल मीडियावर सक्रिय दिसत नाहीत. गेल्या कित्येक वर्षांपासून ते जेठालालच्या भूमिकेतून चाहत्यांचे मनोरंजन करत आहेत.
नुकताच दिलीप जोशी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये त्यांनी हैराण करणारे भाष्य केले. दिलीप जोशी हे आता तारक मेहता मालिकेतून काही दिवसांसाठी ब्रेक घेत आहेत. यामुळेच त्यांच्या चाहत्यांमध्ये मोठी निराशा बघायला मिळतेय.
दिलीप जोशी हे धार्मिक यात्रेला जात असल्याने त्यांनी मालिकेतून ब्रेक घेतलाय. धार्मिक यात्रेसाठी दिलीप जोशी हे अबू धाबीला जाणार आहेत. तारक मेहता मालिकेत ते गणेशोत्सवामध्येही दिसणार नाहीत. आता पुढील काही दिवस चाहते हे दिलीप जोशी यांना मिस करताना दिसणार आहेत. दिलीप जोशी यांनी शेअर केलेला हा व्हिडिओ खूप व्हायरल होताना दिसतोय.