बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi) आज येणार आहे आपल्या सगळ्यांचा लाडका जितेंद्र जोशी (Jitendra Joshi). सदस्यांबरोबर गप्पा तर रंगणार आहेत पण याचसोबत तो सदस्यांना टास्क देखील देणार आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये जितेंद्र जोशी सदस्यांना एक सरप्राइज देताना दिसणार आहे.
जितेंद्र जोशी यांनी सदस्यांना सांगितले, “कुटुंबियांच्या शुभेच्छा घेऊन आलो आहे त्यांनी पत्र लिहिली आहेत तुमच्यासाठी. ज्याच्या हातात रिंग राहील त्या विजेत्यालाच पत्र मिळणार. अपूर्वा तू जिंकली असतीस तरी माझ्याकडे एक विशेष अधिकार आणखी आहे.” आता काय असेल हा विशेष अधिकार ? कोणत्या सदस्यांना मिळणार पत्र वाचण्याची संधी बघूया आजच्या भागामध्ये.
जितेंद्र जोशी यांनी सादर केलेली ‘एकांत’ ही कविता ऐकून सदस्य भावूक झालेले पाहायला मिळतील. तर BB कॉलेज मध्ये पार पडणाऱ्या टास्क मध्ये कोणत्या सदस्याने कोणाला टार्गेट केले हे देखील आजच्या भागामध्ये समजणार आहे. आज रात्री १०.०० वाजता कलर्स मराठीवर बिग बॉसमध्ये या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांना पाहायला मिळतील.