नवी दिल्ली: टीम इंडियाचा हॅन्डसम कॅप्टन के एल राहुल (K L Rahul) सध्या क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. सध्या के एल राहुल त्याच्या लग्नाच्या तयारीत मग्न आहे. त्याची होणारी बायको अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) सध्या स्ट्रिक्ट डाएटवर काम करतेय. अथियाने आपल्या इन्स्टावर नुकत्याच दोन स्टोरीज शेअर केल्यात, त्यात ती सुंदर दिसतेय. लग्नात (k L Rahul And Athiya Shetty Wedding) अधिक सुंदर दिसण्यासाठी ३० वर्षीय अथिया स्पेशल डाएट घेतेय. या क्यूट कपलचा विवाह सोहळा २१ ते २३ जानेवारीच्या दरम्यान खंडाळ्यात सुनील शेट्टीच्या हवेलीत होणार आहे.
अथिया लिक्विड डाएटवर
अथिया खरंतर रोज जीमला जाते. मात्र परफेक्ट शेपमध्ये दिसण्यासाठी ती कठोर डाएट फॉलो करतेय. आपल्या आयुष्यातल्या खास दिवशी परफेक्ट दिसण्यासाठी तिनं अनुष्का शर्मा, दीपिका पादुकोण आणि कतरिना कैफकडून प्रेरणा घेतली आहे. बॉलिवूडच्या या तिन्ही अभिनेत्री लग्नाआधी कठीण फूड डाएट फॉलो करत होत्या आणि जंक फूडपासूनही लांबच होत्या. अथियाही आपल्या डाएटमध्ये पातळ पदार्थ आणि भाज्यांचं सेवन करत आहे.
खंडाळ्यात विवाहसोहळा
अथिया लग्नाच्या दिवशी लेहंगा घालणार आहे. या लेहंग्याच्या जवळ जाणारा रंगाचा ड्रेसच राहुलही परिधान करेल. अथियाचा ड्रेस मनिष मल्होत्राने डिझाईन केल्याची माहिती मिळाली आहे. मात्र राहुलचा ड्रेस कोण डिझाईन करणार आहे हे कळू शकलेलं नाही. या कपलनं आपल्या जवळच्या मित्र मैत्रिणींच्या २१ ते २३ जानेवारी या तारखा बुक केलेल्या आहेत.
[read_also content=”आर्थिक मंदीची झळ – अमेझॉनची सगळ्यात मोठी नोकर कपात, ‘इतक्या’ कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड https://www.navarashtra.com/world/amazon-to-lay-off-over-18000-employees-due-to-uncertain-economy-nrsr-359401/”]
तीन वर्षांपासून डेटिंग
केएल राहुल आणि अथिया शेट्टी हे तीन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. आधी ते डिसेंबर महिन्यात लग्नबंधनात अडकणार असल्याचे म्हटले जात होते. तसेच दोघेही साऊथ इंडियन असल्यामुळे त्यांचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाट साउथ इंडियन पद्धतीने पार पडणार असल्याच्या चर्चादेखील रंगल्या आहेत. काही दिवसांपूर्वी अथियाचे वडील अभिनेता सुनील शेट्टी यांना अथिया आणि राहुल लग्न कधी करणार ? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी ते लवकरच लग्न करणार असल्याचं सांगितलं होतं.