वेगवेगळ्या शैलीतील हिट गाणी लिहिण्यासाठी ओळखले जाणारे कौशल किशोर यांनी उत्सव आणि भक्तीगीतांसाठी एक खास ओळख निर्माण केली आहे. त्याचे नवीन रोमँटिक गाणे ‘सारे तुम्हारे हो गये’ फार प्रसिद्ध कलाकृती आहे. हे त्यांचे अखिल सचदेवासोबतचे पहिलेच कोलॅब्रेशन नाही तर २०२५ मधील पहिले रोमँटिक गाणे देखील आहे. या गाण्याबद्दल आणि अखिलसोबत काम करण्याबद्दल बोलताना कौशल म्हणाले की, “अखिल सचदेवा एक उत्तम गायक आणि संगीतकार आहे. आम्ही चार-पाच वर्षांपूर्वी भेटलो होतो आणि तेव्हापासून आम्ही चांगले मित्र आहोत. आम्ही बऱ्याच काळापासून एकत्र काम करत आहोत.” आणि अखेर ‘सारे तुम्हारे हो गये’ मुळे ते शक्य झाले आहे.”
कौशलने सांगितले की, या गाण्याचे काम एका वर्षापूर्वी सुरू झाले होते. “अखिलने दिल्लीतील त्याच्या घरच्या स्टुडिओमध्ये मला गाण्याचे स्क्रॅच व्हर्जन वाजवले. त्यानंतर आम्ही एकत्र गीत आणि संगीतावर काम केले. जेव्हा भूषण कुमार सरांनी ते ऐकले तेव्हा त्यांना ते गाणे खूप आवडले. हे गाणे फार Soulful आहे. ते हृदयस्पर्शी आहे, तसेच या गाण्यामध्ये अखिलचा सुंदर आवाज ऐकण्यास मिळणार आहे आणि सुंदर दृश्येही पाहायला मिळणार आहेत.”
अखिलसोबतच्या त्याच्या नात्याबद्दल सांगताना कौशल म्हणाला की, “मी आणि अखिल पहिल्यांदाच या गाण्याच्या निमिताने सोबत काम करत आहोत आणि मला फार आनंद आहे की आमच्याकडे आणखी गाणी आहेत. ही आमच्या प्रवासाची फक्त सुरुवात आहे आणि मी उत्सुक आहे. चाहत्यांना आमच्याकडून नवनवीन ऐकायला मिळणार आहे. मी अखिलसोबत काम करण्यास फार उत्सुक आहे. मला आशा आहे की लोकांना आमची गाणी नक्कीच आवडतील. ‘सारे तुम्हारे हो गये’ रिलीज झाल्यापासून मला खूप अभिनंदनाचे संदेश येत आहेत. मुळात, अखिल आणि टी-सीरीज बरोबरचा हा अनुभव मला आठवणीत राहील आणि हा अनुभव फार छान होता.”
कुंभमेळ्याच्या खास प्रसंगी प्रदर्शित झालेल्या ‘महाकुंभ है’ या भक्तीगीतातही कौशलची सर्जनशीलता दिसून आली आहे. ‘सारे तुम्हारे हो गये’ या गाण्याद्वारे कौशल किशोरने पुन्हा एकदा आपली प्रतिभा सिद्ध केली आहे. तिची आणि अखिल सचदेवाची आगामी गाणी ऐकण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.