(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
अल्ट्रा झकास, मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म, प्रजासत्ताक दिनानिमित्त खास प्रस्तुती घेऊन येत आहे. ‘सौभाग्यवती सरपंच’ ही ग्रामीण भागातील महिला सशक्तीकरणाचा संदेश देणारी वेब सिरीज 22 जानेवारी 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘सौभाग्यवती सरपंच’ ही फक्त एका स्त्रीच्या यशाची कहाणी नाही, तर ती प्रत्येक महिलेच्या संघर्षाला प्रेरणा देणारी आहे. महिला सशक्तीकरण हे समाजाच्या प्रगतीसाठी अत्यावश्यक असून, स्वातंत्र्य, शिक्षण, आणि नेतृत्व या तीन गोष्टी प्रत्येक महिलेचे हक्क आहेत हेच या वेब सिरीस मधून आपल्याला पाहायला मिळणार आहे.
Ram Gopal Varma: राम गोपाल वर्मांना होणार अटक! ७ वर्ष जुन्या केसप्रकरणी न्यायालयाचा आदेश!
ग्रामीण भागातील महिला सशक्तीकरणाची ही कथा त्यांच्या संघर्षांची, यशाची आणि अडथळ्यांवर मात करण्याच्या जिद्दीची आहे. “सौभाग्यवती सरपंच” या नवीन वेबसिरीज मध्ये हे दाखवण्यात आले आहे की गावातील महिला जेव्हा समाजाच्या विकासासाठी पुढाकार घेतात, तेव्हा त्यांना अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागते. परंतु या महिलांनी दाखवून दिले की जिथे महिलांना स्वप्न पाहण्याचे स्वातंत्र्य दिले जाते,तिथे समाजाची खरी प्रगती होते. संतोष कोल्हे दिग्दर्शित, या सिरीजमध्ये देविका दफ्तरदार, किशोर कदम, नागेश भोसले आणि अश्विनी कुलकर्णी सारखे उत्तम कलाकारांच्या भूमिका पाहायला मिळणार आहेत. ही सिरीज अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर पाहता येणार आहे.
‘सौभाग्यवती सरपंच’ ची कथा
एका सामान्य गृहिणीच्या कर्तृत्वाचा आणि तिच्या यशाचा प्रवास म्हणजेच ‘सौभाग्यवती सरपंच’. महिला आरक्षित सरपंच पदावर निवडून आल्यानंतर एका सध्या गावातली गृहिणी कशी विकासासाठी स्वतःला झोकून देते आणि रूढीवादी मानसिकतेला कसा प्रतिउत्तर देते, याची प्रेरणादायी कथा या सिरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. परंतु या प्रवासात तिच्या समोर अनेक अडचणी येतात. कधी घरातील अपेक्षांचा ताण, तर कधी गावातील प्रश्नांवर उपाय शोधण्याची गरज. मात्र, तिच्या प्रत्येक निर्णयामध्ये गावाच्या भल्यासाठीची तळमळ आणि कुटुंबाच्या आनंदासाठीचा त्याग दिसतो, जो प्रेक्षकांच्या हृदयाला नक्कीच भिडतो. घराची, जवळच्या नात्यांची व सरपंपदाची जबाबदारी पार पडत असताना अडचणी उभ्या राहतात आणि त्या अडचणींवर ती कसे तोडगे काढते, हे केवळ महिलांनीच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राने बघण्यासारखे आहे. अवलीच्या संघर्षाचा आणि यशाचा प्रवास प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठी एक संदेश ठरणार आहे.
उघड झाले रहस्य; स्टार प्लसने सादर केली ‘जादू तेरी नजर’ या मालिकेची पहिली झलक!
अल्ट्रा झकासचे सीईओ सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले, “मराठीतील सौभाग्यवती सरपंच ही कॉमेडी वेबसिरीज आम्ही तुमच्यासमोर घेऊन येत आहोत, कारण यात दोन महिला सरपंच जेव्हा समोरासमोर येऊन एकमेकींवर दबाव टाकतात, तेव्हा त्यांच्यातील जुगलबंदी खरंच पाहण्यासारखी आहे. ही सिरीज केवळ मनोरंजन देत नाही, तर प्रेक्षकांना समाजातील महिलांच्या भूमिकेबद्दल विचार करायला प्रवृत्त करते. आम्हाला खात्री आहे की ‘सौभाग्यवती सरपंच’ प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.” ही सिरीज 22 जानेवारी 2025 अल्ट्रा झकास मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म प्रदर्शित होणार आहे.