फोटो सौजन्य - The Khabri X अकाउंट
खतरो के खिलाडी सिझन १४ : खतरो के खिलाडीचा नवा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोमध्ये टेलिव्हिजनवरचे अनेक प्रसिद्ध कलाकार सहभागी होतात. खतरो के खिलाडी सिझन १४ मध्ये अनेक बिग बॉसमधील जुने खेळाडू सहभागी झाले आहेत. रोहित शेट्टीचा हा शो २७ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये टेलिव्हिजनवरचा बिग बॉस शो मध्ये गश्मीर महाजनी, नियती फतनानी, असीम रियाझ, करणवीर मेहरा, निमृत अहलुवालिया, अभिषेक कुमार, शालीन भानोट, सुमोना चक्रवर्ती आणि कृष्णा श्रॉफ या सीझनमध्ये खेळाडू म्हणून दिसणार आहेत. सध्या या खेळाडूंचे प्रोमो कलर्स टीव्हीने शेअर केले होते. यामध्ये एक वादग्रस्त प्रोमो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
व्हायरल झालेल्या प्रोमोमध्ये आसीम रियाझ आणि अभिषेक कुमार यांच्यामध्ये वाद झाल्याचे दिसत आहे. यामध्ये दोघे मारामारीपर्यत पोहोचले आहेत. नियती फतनानी ही सुरुवातीला बोलताना दिसते की ” असीम सारखा बोलत असतो की मी खूप दुःख झेललं आहे. यावर असीम म्हणतो की, हे कुठे समजणार हे त्या लेव्हलला आले नाहीत. यावर नियती फतनानी म्हणते की, आम्हाला त्या लेव्हलला यायचे सुद्धा नाहीये. या दोघांच्या वादामध्ये अभिषेक कुमार असीमला म्हणतो की अरे भांडतोय कशाला? यावरून या दोघांचे भांडण सुरु होते आणि दोघे मारामारी पर्यत पोहोचतात. पुढे एपिसोडमध्ये काय होईल हे पाहणे महत्वाचे ठरेल.
#AbhishekKumar ne #AsimRiaz aur uske arrogance ko 1 minute me baja daala 😂
— The Khabri (@TheKhabriTweets) July 14, 2024
असीम आणि अभिषेकचा प्रोमो प्रदर्शित झाल्यानंतर आता त्यांचे चाहते देखील X वर वाद घालत आहेत. त्यामुळे एपिसोडमध्ये काय होईल हे पाहणे मनोरंजक ठरेल. यावर होस्ट रोहित शेट्टीची काय प्रतिक्रिया असेल हे देखील पाहणे इंटरेस्टिंग ठरेल.
खतरो के खिलाडी या शोचे यंदाचे शूटिंग रोमानियामध्ये झाले आहे. काही दिवसापूर्वी, निर्मात्यांनी ‘खतरों के खिलाडी १४’ च्या रिलीजबाबत खुलासा केला होता. ‘खतरों के खिलाडी १४’चा प्रीमियर २७ जुलै २०२४ रोजी फक्त कलर्स आणि जिओ सिनेमावर प्रदर्शित होणार आहे.