फोटो सौजन्य - Social Media
‘स्त्री २’ या चित्रपटाने सिनेमाघरात पाऊल ठेवताच कहर करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे स्त्री २ चित्रपटाच्या येण्याच्या बातमीनेच प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली होती. या सिनेमासाठी असणारी लोकांची उत्सुकता काही औरच होती. चित्रपटाने सिनेमाघरात येताच अनेक सिनेमांना धोबी पछाड दिला आहे. ‘स्त्री २’ भारताच्या स्वातंत्र्य दिनी म्हणजेच १५ ऑगस्ट रोजी सिनेमाघरात सर्वत्र प्रदर्शित करण्यात आले होते. याच दिवशी अनेक हिंदी तसेच दक्षिण भारतीय भाषेतील चित्रपट प्रदर्शित केले होते. एकंदरीत, सिनेसृष्टीत स्पर्धेचे वातावरण होते. यादरम्यान, स्त्री २ ला प्रेक्षकांनी इतकी पसंती दिली आहे कि सिनेमाने अनेक सिनेमांना मागे टाकले आहे. इतकेच नव्हे तर स्त्री २ सिनेमाने काही रेकॉर्डस् आपल्या नावे करून घेतले आहे.
‘स्त्री २’ चित्रपट ठरला २०२४ वर्षातील सगळ्यात मोठा ओपनर
स्त्री २ साठी लोकांची उत्सुकता बॉक्स ऑफिस कलेक्शन मध्ये दिसून येत आहे. चित्रपट सुरुवातीच्या दिवसापासूनच रेकॉर्ड बनवणे तसेच रेकॉर्ड तोडण्याचे काम करत आहे. स्त्री २ ने पहिल्याच दिवसात रेकॉर्ड ब्रेक कमाई केली असून २०२४ मधील सगळ्यात मोठा ओपनर भारतीय चित्रपट म्हणून स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. याअगोदर फायटर चित्रपट यंदाच्या वर्षीच बेस्ट ओपनर चित्रपट होता. फायटरने पहिल्या दिवशी २४ कोटींची कमाई केली होती, जी स्त्री २ चित्रपटाने मोडून काढली आहे.
हिंदी सिनेसृष्टीतील ‘बेस्ट ओपनर’
श्रध्दा कपूर तसेच अभिनेता राजकुमार राव स्टारर सिनेमा ‘स्त्री २’ यंदाच्या वर्षीचा बेस्ट ओपनर चित्रपटाचा मानकरी तर ठरलेच आहे, त्याचबरोबर सिनेमाने हिंदी सिनेसृष्टीतील बेस्ट ओपनर फिल्मचा टायटल स्वतःच्या नावी करून घेतले आहे. स्त्री २ चा ओपनिंग डे कलेक्शन ५१.८ कोटी रुपये इतका होता तर प्रिव्हयु शोज मिळून एकूण कलेक्शन ६०.३ कोटी इतकी आहे.
स्वातंत्र्यदिनी सगळ्यात जास्त कमाई करणारा चित्रपट
गेल्या वर्षी १५ ऑगस्टला सनी देओलचा सिनेमा गदर २ प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ५५.४० कोटींची कमाई केली होती. बहुतेक जणांना वाटत होते कि हा आकडा तोडणे अशक्य आहे. परंतु, स्त्री २ ने गदर २ चित्रपटाचा रेकॉर्ड तोडत स्वातंत्र्यदिनी सगळ्यात जास्त कमाई करणारा चित्रपट म्हणून स्थान मिळवले आहे.
स्त्री २ चित्रपटाने ‘या’ चित्रपटांना टाकले मागे
‘स्त्री २’ ने ५ नुकतेच गाजलेल्या सिनेमांना धोबी पछाड दिला आहे. या चित्रपटांमध्ये ‘एनिमल’, ‘भूल भुलैया 2’, ‘पठान’, ‘एनिमल’ तसेच ‘वॉरचा समावेश आहे.