सौजन्य: सोशल मीडिया
नवी दिल्ली: समंथा रुथ प्रभू ही साऊथची एक उत्तम अभिनेत्री आहे. ती तिच्या दमदार अभिनय आणि ग्लॅमरसाठी ओळखली जाते. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत समंथाने एका एपिसोडमध्ये निरोगी खाण्याचे काय महत्त्व आहे हे सांगितले . यादरम्यान अभिनेत्रीने खुलासा केला की तिने काही घातक फूड ब्रँडच्या जाहिरात करून तिच्या आयुष्यात चुका केल्या होत्या, ज्यातून तिने एकेकाळी करोडो रुपये कमावले होते. समंथा रुथ प्रभूहिने तिच्या पॉडकास्ट ‘टेक 20’ च्या एका एपिसोडमध्ये जीवनशैली आणि निरोगी आयुष्य याचे तज्ञ अल्केश शारोत्री यांच्यासोबत निरोगी खाण्याच्या महत्त्वावर चर्चा केली. यादरम्यान एका यूजरच्या कमेंटने त्यांचे लक्ष वेधून घेतले. एका वापरकर्त्याने समंथाबद्दल टिप्पणी केली की ती स्वत: घटक फूड ब्रँडचे समर्थन करते आणि तिच्या पॉडकास्टवर निरोगी खाण्याबद्दल बोलते.
अभिनेत्रीने कबूल केले की तिने हानिकारक फूड ब्रँडच्या जाहिराती करून खूप मोठी चूक केली होती. ज्यातून तिने एकेकाळी करोडोंची कमाई केली होती. ती म्हणाली, ”माझ्याकडून याआधी अनेक चुका झाल्या आहेत, पण तेव्हा मला त्याबद्दल फारशी माहिती नव्हती, पण आता मी अनेक जाहिरातींच्या ऑफर नाकारल्या आहेत. निरोगी राहण्यासाठी मी जे काही सांगते, ते मी माझ्या रोजच्या आयुष्यातही पाळते.” समांथाने 2022 मध्ये खुलासा केला होता की तिला मायोसिटिस नावाचा आजार आहे आणि तिच्या उपचारासाठी ती अभिनयातून एक वर्षाचा ब्रेक घेत आहे. सोप्या भाषेत, मायोसिटिस ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये शरीरातील स्नायू कमकुवत, थकल्यासारखे आणि वेदनादायक होऊ शकतात यामध्ये शरीराच्या आत सूज येऊ लागते. ही सूज सहसा खांदे, हात, पाय, मांड्या, कंबर आणि नितंब यांच्या स्नायूंना येते. यामुळे अन्ननलिका, हृदय आणि फुफ्फुसावर परिणाम होऊ शकतो.
तेलुगु चित्रपटात पदार्पण
समंथाने 2010 मध्ये रवि वर्मनच्या ‘ये माया चेसावे’ या तेलुगु चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. यात तिच्या सोबत अभिनेता नागा चैतन्य होता. अभिनेता नाग चैतन्य आणि अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हे ‘ये माया चेसावे’ या चित्रपटाच्या सेटवर एकमेकांच्या प्रेमात पडले. 2017 मध्ये या दोघांनी धूमधडाक्यात लग्न केलं आणि लग्नाच्या अवघ्या चार वर्षांतच दोघं विभक्त झाले. हा चित्रपट हिट झाला आणि प्रेक्षकांना त्यांची केमिस्ट्री खूप आवडली. त्यानंतर तो ‘नीथने एन पोनवसंथम’, ‘ईगा’, ‘डूकुडू’, ‘सीथम्मा वकितलो सिरिमल्ले चेट्टू’, ‘अत्तारिंटिकी दरेडी’, ‘कठ्ठी’, ‘थेरी’, ’24’, ‘मेर्सल’, यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केले तसेच ‘रंगस्थलम’, ‘आ आ’, ‘महानती’, ‘सुपर डिलक्स’, ‘माजिली’, ‘शकुंतलम’ आणि ‘कुशी’ यांसारख्या साऊथ सिनेसृष्टीतील लोकप्रिय झालेल्या चित्रपटांमध्येही ती दिसली होती. ‘द फॅमिली मॅन’ या वेब सीरिजमधून तिने हिंदी सिनेविश्वात पदार्पण केले. त्यात ती ‘राजी’ नावाच्या दहशतवाद्याच्या भूमिकेत दिसली होती.






