जगभरात मधुमेहाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. आहारात होणारे बदल आणि आनुवंशिकतेचा परिणाम शरीरावर झाल्यानंतर गंभीर आजारांची लागण होण्याची शक्यता असते. त्यामुळे कायमच संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. रक्तात साखरेची पातळी वाढल्यानंतर शरीरात अनेक गंभीर दिसून येतात. पण या बदलांकडे कायमच दुर्लक्ष केले जाते. कायमच दुर्लक्ष केल्यास रक्तातील साखर झपाट्याने वाढून शरीरातील इतर अवयवांना हानी पोहचते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी स्वयंपाक घरातील कोणत्या स्वस्त पदार्थांचे नियमित सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – istock)
रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात करा 'या' स्वस्त पदार्थांचे सेवन

थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात मोठ्या प्रमाणावर हिरव्या पालेभाज्या उपलब्ध असतात. हिरव्या पालेभाज्यांचे सेवन केल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. मधुमेहाने त्रस्त असलेल्या रुग्णांनी नियमित पालेभाज्यांचे सेवन करावे.

भारतीय आहारातील महत्वाचा पदार्थ म्हणजे डाळी. रोजच्या जेवणात भातासोबत खाण्यासाठी मसूर डाळ, तूरडाळ किंवा मूगडाळीचे वरण बनवले जाते. या डाळी सहज पचन होतात.

सकाळच्या नाश्त्यात किंवा रात्री झोपण्याआधी दूध प्यायल्यास शरीराला अनेक फायदे होतील. दूध केवळ हाडे मजबूत करत नाहीतर मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी सुद्धा मदत करते.

मागील अनेक वर्षांपासून भारतीय आहारात वेगवेगळ्या धान्यांपासून बनवलेल्या भाकरीचा समावेश केला जात आहे. भाकरी खाल्ल्यामुळे पोट भरलेले राहते आणि शरीराला अनेक फायदे होतात.

रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी सकाळी उठून उपाशी पोटी एक लसूण चावून खावा. लसूण खाल्ल्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते.






