"बस तू आहेस सोबत म्हणून..." प्रसाद खांडेकरला मिळाली बायकोची खंबीर साथ, लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शेअर केली खास पोस्ट
महाराष्ट्राच्या हास्यजत्रेने प्रेक्षकांचं खळखळून मनोरंजन केलं आहे. हास्यजत्रेची क्रेझ एकट्या महाराष्ट्रात राहिली नाही, अवघ्या जगभरातल्या प्रेक्षकांमध्ये ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ची क्रेझ पाहायला मिळतेय. विशेष म्हणजे, शोप्रमाणे त्यातील कलाकारही प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय आहे. अशातच सध्या मालिकेतील एक कलाकार चर्चेत आलाय. हास्यजत्रा फेम प्रसाद खांडेकर सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे नुकतंच अभिनेत्याच्या लग्नाचा वाढदिवस होता. अभिनेत्याने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त बायकोसोबतचे फोटो शेअर करत खास पोस्ट लिहित लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
मधुराणी प्रभुलकर सध्या काय करतेय…? दोन शब्दातच दिलं उत्तर
गेल्या काही दिवसांपासून अभिनेता चाहत्यांमध्ये, ‘थेट तुमच्या घरातून’ नाटकामुळे चर्चेत आहे. नुकतंच त्याने नाटकाची घोषणा केली असून अभिनेत्याने नाटकाची निर्मितीची, लेखनाची आणि दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. ‘थेट तुमच्या घरातून’ नाटकामध्ये प्रसादसोबत मुख्य भूमिकेत, अभिनेत्री शिवाली परब, ओंकार राऊत, भक्ती देसाई, प्रथमेश शिवलकर आणि नम्रता संभेरावर पाहायला मिळणार आहेत. २१ डिसेंबरपासून या नव्या नाटकाचा शुभारंभ प्रयोग होणार आहे. कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणाऱ्या प्रसादने लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने बायकोसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.
हैदराबाद सिनेमागृहात चेंगराचेंगरी प्रकरणी पुष्पा-2 अभिनेता अल्लू अर्जुनला अटक, सुरु आहे कारवाई!
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना प्रसाद म्हणतो, “लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बायको (अल्पा)… बस तू आहेस सोबत म्हणून तुझ्या साथीने एक एक टप्पा पार करतोय… अजून खुप टप्पे पार करायचेत… जस प्रोत्साहन देत पुढे ढकलतेस तसच प्रसंगी घट्ट पाय रोवून ठेहराव पण घ्यायला लावतेयस… प्रेमाची ९ वर्ष आणि लग्नाची ११ वर्ष… एकूण २० वर्ष कशी गेलीत कळलं नाही… मित्रामधून प्रियकर, प्रियकरमधून नवरा, नवऱ्यातून बाप… एकांकिकेतून नाटकामध्ये, नाटकांमधून टेलिव्हिजनवर, टेलिव्हिजनवरून सिनेमात… चाळीतून वनरुम किचनमध्ये, वनरुम किचनमधून 1 bhk मध्ये, 1 bhk मधून 2 bhk मध्ये… Best बस मधून बजाज चेतक स्कुटर वर, बजाज चेतक स्कुटर वरून बजाज एव्हेंजर, एव्हेंजर वरून फोर व्हीलर कार… ह्या आणि अश्या कित्येक प्रवासातसोबत राहिली आहेस… म्हणून इथपर्यंत पोहोचलोय… I LOVE YOU SO MUCH MRS KHANDEKAR… अल्पा Happy Wedding Anniversary अशीच सोबत राहा आणि हसत राहा. अप्पू….”
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानंतर दोघांनीही एकमेकांना खास लग्नाच्या वाढदिवसानिमित्त गिफ्ट दिले. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानंतर प्रसादने दोघांनीही दिलेल्या गिफ्टचा फोटो पोस्टमध्ये शेअर केला होता. प्रसादने बायकोला लग्नाच्या वाढदिवसानिमित्त लॅपटॉप गिफ्ट केला आहे. तर रिटर्न गिफ्ट म्हणून अल्पाने प्रसादला खास दागिना गिफ्ट केला आहे. प्रसाद खांडेकरच्या बायकोबद्दल सांगायचं तर, अल्पाचा स्वतःचा व्यवसाय आहे. तिचा स्वतःचा केक, चॉकलेट बनवण्याचा बिझनेस आहे. तिच्या बिझनेसचं ‘स्वीट मेमरीज’ (Sweet memories) असं नाव आहे. प्रसाद सोशल मीडियावर नेहमी अल्पाबरोबर फोटो, व्हिडीओ शेअर करत असतो.
‘पंचायत’च्या दामादजीने गर्लफ्रेंडशी केलं लग्न, फोटो शेअर करत म्हणाला…






