Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘थांब म्हंटलं की थांबायचं…’, ट्विस्ट आणि टर्न्सनी भरलेला अंकुश चौधरीच्या ‘पी.एस.आय. अर्जुन’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज

नुकताच 'पी.एस. आय. अर्जुन' चा भव्य ट्रेलर लाँच सोहळा अतिशय अनोख्या पद्धतीने पार पडला. यावेळी पोलीस स्टेशनचे रिक्रिएशन करून जेलमध्ये हा सोहळा संपन्न झाला. प्रेक्षकांच्या मनात चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली.

  • By चेतन बोडके
Updated On: May 03, 2025 | 07:33 PM
‘थांब म्हंटलं की थांबायचं...’, ट्विस्ट आणि टर्न्सनी भरलेला अंकुश चौधरीच्या ‘पी.एस.आय. अर्जुन’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज

‘थांब म्हंटलं की थांबायचं...’, ट्विस्ट आणि टर्न्सनी भरलेला अंकुश चौधरीच्या ‘पी.एस.आय. अर्जुन’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज

Follow Us
Close
Follow Us:

बऱ्याच दिवसांपासून अंकुश चौधरीच्या वर्दीतील लुकची व डायलॉगची सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे. महाराष्ट्राचा ‘स्टाईल आयकॉन’ आणि ‘पॉवर परफॉर्मर’ अंकुश चौधरी ‘पी. एस. आय. अर्जुन’मध्ये फुल ॲक्शन रोलमध्ये दिसत आहे. चित्रपटाचे टीझर आणि गाणे आधीच प्रेक्षकांच्या पसंतीस येत असून, प्रेक्षकांच्या मनात या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. ही उत्सुकता अधिक वाढवण्यासाठी आता या चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. नुकताच ‘पी.एस. आय. अर्जुन’ चा भव्य ट्रेलर लाँच सोहळा अतिशय अनोख्या पद्धतीने पार पडला. यावेळी नवापूर पोलीस स्टेशनचे रिक्रिएशन करून जेलमध्ये हा सोहळा संपन्न झाला.

प्रसिद्ध टिव्ही अभिनेत्रीने दिला गोंडस बाळाला जन्म, लग्नाच्या काही वर्षांनी झाले कपल आई- बाबा

चित्रपटातील पोलीस अधिकारी बेड्या ठोकून अंकुश चौधरीला जेलमध्ये घेऊन आले. अंकुशची ही धमाकेदार एंट्री सर्वांनाच भावली. तसेच यावेळी चित्रपटातील प्रमोशनल सॉन्गही येथे सादर झाले. मराठीत इतक्या भव्यदिव्य आणि आगळ्यावेगळ्या स्वरूपात पार पडलेला हा बहुदा पहिला ट्रेलर लाँच सोहळा असावा. या ट्रेलर लाँचला चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती.

ट्रेलरमध्ये अंकुश चौधरींची व्यक्तिरेखा संभ्रम निर्माण करणारी दिसत आहे. त्यामुळे तो नक्की चोर आहे की पोलीस, याचे उत्तर प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यावरच मिळणार आहे. असे असले तरी अंकुशचा पोलिसांच्या वर्दीतील डॅशिंग लूक, बिनधास्त ॲक्शन आणि कमाल डायलॉग्स प्रेक्षकांचे लक्ष वेधत आहेत. ट्रेलर पाहून चित्रपटात अनेक रहस्ये असल्याचे दिसतेय. त्यामुळे या उत्कंठावर्धक चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत, हे नक्की !

ट्रेलरबद्दल दिग्दर्शक भूषण पटेल म्हणतात, “मराठी प्रेक्षक चोखंदळ असल्याने त्यांच्यासाठी एखादा जबरदस्त चित्रपट घेऊन येण्याची खूप इच्छा होती. पीएसआय अर्जुन एक असा चित्रपट आहे, ज्यात ॲक्शन, सस्पेन्स, रोमान्स असे सगळेच आहे. त्यामुळे फॅमिलीसाठी हा चित्रपट म्हणजे मनोरंजनाचे परिपूर्ण पॅकेज आहे. माझ्या पहिल्याच चित्रपटात अंकुश चौधरीसारखा अभिनेता आम्हाला लाभला. इतके नामवंत कलाकार आमच्या या चित्रपटात सहभागी झाले, यातच सर्व काही आले. ट्रेलरवरून प्रेक्षकांना चित्रपटाचा अंदाज आला असलेच. आम्ही प्रेमाने आणि मेहनतीने हा चित्रपट बनवला आहे. आता ९ मेपासून आम्ही तो प्रेक्षकांच्या स्वाधीन करणार आहोत. मला खात्री आहे, प्रेक्षक ‘पी. एस. आय. अर्जुन’वर भरभरून प्रेम करतील.”

पहलगाम हल्ल्यानंतर भारतात ‘अबीर गुलाल’वर बंदी, वाणी कपूरने उचललं ‘हे’ मोठं पाऊल

निर्माते विक्रम शंकर म्हणतात, “चित्रपटाच्या ट्रेलरचे लाँचिंग वेगळया पद्धतीने करण्याचे मनात होते. चित्रपट पोलिसांवर आधारित असल्याने जेलमध्ये ट्रेलर लाँच सोहळा करावा असे ठरले. खूप वेगळा असा चित्रपट आम्ही प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहोत. चित्रपटातील डायलॅाग्स सध्या खूप व्हायरल होत आहेत. त्यात नुकतेच प्रदर्शित झालेले गाणेही धुमाकूळ घालत आहे. रसिकांकडून मिळणारा असा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला उत्साह देणारा आहे. मुळात ही चित्रपटाची टीम कमाल आहे. बॅालिवूडला सुपरहिट थ्रिलर चित्रपट देणारे दिग्दर्शक, मराठीतील सर्वोत्कृष्ट कलाकार, नकाश अजीज यांच्यासारखा गायक अशी उत्तम भट्टी जमून आली आहे.”

‘आतली बातमी फुटली’मध्ये विजय निकम साकारणार भाई; लूकने वेधलं लक्ष

या चित्रपटात अंकुश चौधरीसह किशोर कदम, राजेंद्र शिसटकर, नंदू माधव, कमलाकर सातपुते आणि अक्षया हिंदळकर यांच्या प्रमुख आहेत. व्हिस्ट्रोमॅक्स सिनेमा, ड्रिमविव्हर एंटरटेनमेंट निर्मित ‘पी.एस.आय.अर्जुन’चे भूषण पटेल दिग्दर्शक आहेत तर विक्रम शंकर आणि ध्रुव दास निर्माते आहेत. येत्या ९ मे २०२५ रोजी चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Marathi actor ankush chaudhari starrer psi arjun marathi movie trailer released

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2025 | 07:33 PM

Topics:  

  • Ankush Choudhary
  • marathi actor
  • marathi movie

संबंधित बातम्या

शशांक केतकरसाठी कलाकार एकवटले, ‘या’ निर्मात्याबद्दल अनेकांच्या तक्रारी, अभिनेत्री शिल्पा नवलकर; म्हणाल्या…
1

शशांक केतकरसाठी कलाकार एकवटले, ‘या’ निर्मात्याबद्दल अनेकांच्या तक्रारी, अभिनेत्री शिल्पा नवलकर; म्हणाल्या…

‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ चित्रपटाचा भव्य ट्रेलर अनावरण सोहळा संपन्न!
2

‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ चित्रपटाचा भव्य ट्रेलर अनावरण सोहळा संपन्न!

रणपती शिवराय चित्रपटातून चिन्मय मांडलेकरची एक्झिट! ‘या’ कारणामुळे शिवरायांची भूमिका करण्यास दिला नकार
3

रणपती शिवराय चित्रपटातून चिन्मय मांडलेकरची एक्झिट! ‘या’ कारणामुळे शिवरायांची भूमिका करण्यास दिला नकार

‘केस नं. ७३’ मुखवट्यामागील गडद रहस्य येणार प्रेक्षकांच्या समोर, वकील बनून सत्यासाठी लढणार ‘ही’ अभिनेत्री
4

‘केस नं. ७३’ मुखवट्यामागील गडद रहस्य येणार प्रेक्षकांच्या समोर, वकील बनून सत्यासाठी लढणार ‘ही’ अभिनेत्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.