Amruta Pawar Blessed With Baby Boy Actress Shared Good News On Social Media
‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ मालिकेतून महाराष्ट्रातल्या घराघरांत अभिनेत्री अमृता पवार पोहोचलीये. कायमच अभिनयामुळे चर्चेत राहिलेली अमृता सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.. गेल्या काही दिवसांपुर्वीच अमृताने इन्स्टाग्रामवर आई होणार असल्याची आनंदाची बातमी चाहत्यांना दिली होती. आता अमृता आणि तिचा पती नील दोघेही आई- बाबा झाले आहेत. अमृताच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं असून तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही गोड बातमी शेअर केली आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात ‘अबीर गुलाल’वर बंदी, वाणी कपूरने उचललं ‘हे’ मोठं पाऊल
अमृता आणि नीलला पुत्ररत्नाची प्राप्ती झाली असून एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अभिनेत्रीने गोंडस बाळाला जन्म दिला आहे. दरम्यान, अमृताने २६ एप्रिल २०२५ रोजी गोंडस मुलाला जन्म दिला. मुलगा झाल्याची बातमी तिने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली आहे. आई झाल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांनी अमृताचं अभिनंदन केलं आहे. लग्नाच्या दीड वर्षांनंतर अमृता आई झाली आहे. त्यामुळे तिचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
‘आतली बातमी फुटली’मध्ये विजय निकम साकारणार भाई; लूकने वेधलं लक्ष
अमृताच्या घरी चिमुकल्याचे आगमन झाल्याची माहिती अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. अमृताचा पती नीलने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे त्यांना मुलगा झाल्याची गुडन्यूज दिली आहे. “कुटुंब! जिथे जीवन सुरू होते आणि प्रेम कधीच संपत नाही.” असं म्हणत नीलने पत्नीला मुलगा झाल्याची खुशखबर सांगितली आहे. अमृताने पती नीलची ही स्टोरी री-शेअर करत आई होण्याची भावना ही जगातील सर्वात सुंदर भावना असल्याचं म्हटलं आहे. अमृताने जुलै २०२२ मध्ये नील पाटीलसोबत लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याची सुरुवात केली. अमृता पवार आणि नील पाटील यांच्या लग्नाला लवकरच तीन वर्षे पूर्ण होतील.
एजाज खानच्या अडचणी वाढल्या! ‘हाउस अरेस्ट शो’ प्रकरणी FIR दाखल
अभिनेत्री अमृता पवारच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर, अमृताने झी मराठीवरील ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ मालिकेसह ‘पाहिले मी तुला’, ‘सीनिअर सिटीजन’, आशीर्वाद तुझा एकविरा आई’, ‘स्वराज्यजननी जिजामाता’ अशा मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. प्रसिद्धी मिळाल्यानंतर अमृताने २०२२ साली नील पाटीलसोबत लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याचा श्रीगणेशा केला होता. लग्नाच्या काही वर्षांनी ते आता आई- बाबा झाले आहेत.