Vaani Kapoor Deleted All Posts From Her Instagram Handle Related Abir Gulaal With Pakistani Actor Fawad Khan
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर भारत सरकार ॲक्शन मोडवर आले आहे. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली भारताने पाकिस्तानवर एकानंतर एक कारवाई सुद्धा करायला सुरुवात केली. पाकिस्तानी कलाकारांचे सोशल मीडिया हँडल भारतात ब्लॉक करण्यात आले.
त्यानंतर भारताच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून पाकिस्तानी अभिनेता फवाद खानच्या ‘अबीर गुलाल’ चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. या चित्रपटात फवाद खानसोबत प्रमुख भूमिकेत बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूर (Vaani Kapoor) सुद्धा मुख्य भूमिकेत आहे. अशातच या चित्रपटावरील बंदीनंतर अभिनेत्री वाणी कपूरने महत्वाचा निर्णय घेतला आहे.
‘आतली बातमी फुटली’मध्ये विजय निकम साकारणार भाई; लूकने वेधलं लक्ष
वाणी कपूर आणि फवाद खान स्टारर ‘अबीर गुलाल’ चित्रपट ९ मे रोजी रिलीज होणार होता. पण त्याआधीच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. काश्मीर हल्ल्यानंतर चित्रपटाला भारतात बॅन करण्यात आलं आहे. चित्रपटाला बॅन करण्यात आल्यामुळे वाणी कपूरने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून ‘अबीर गुलाल’ चित्रपटाच्या संदर्भातील सर्व फोटो व्हिडीओ डिलीट केले आहेत. तिच्या या निर्णयाने सर्वांचेच लक्ष वेधलेय. चित्रपटाला विरोध होत असल्यामुळे अभिनेत्री वाणी कपूरने महत्वाचं पाऊल उचललं आहे.
एजाज खानच्या अडचणी वाढल्या! ‘हाउस अरेस्ट शो’ प्रकरणी FIR दाखल
दरम्यान, ‘अबीर गुलाल’ चित्रपटाविषयी बोलायचं तर, ‘अबीर गुलाल’ चित्रपटातून फवाद खान तब्बल नऊ वर्षांनी बॉलिवूडमध्ये पुनरागमन करणार होता. तो शेवटचा ‘ऐ दिल है मुश्कील’ चित्रपटात झळकला होता. फवाद खान आणि वाणी कपूर यांच्यासह चित्रपटात ज्येष्ठ अभिनेत्री फरीदा जलाल, रिद्धी डोगरा, सोनी राझदान यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत होते. चित्रपटाचे दिग्दर्शन आरती एस. बागरीने केले असून चित्रपटाची शुटिंग लंडनमध्ये करण्यात आलीये. यासोबतच वाणी कपूरचा १ मे रोजी अजय देवगण आणि रितेश देशमुखसोबत ‘रेड २’ चित्रपटही रिलीज झाला.