‘बिग बॉस 16’मध्ये दिसणारा साजिद खानवरील (Sajid Khan) आरोपांची मालिका संपण्याचं नाव घेत नाही आहे. आधी शर्लिन चोप्रा, आहाना कुमार, मंदाना करीमी यांच्यानंतर आता मराठी अभिनेत्री जयश्री गायकवाडने (jayshree gaikwad) साजिद खानवर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. जयश्रीने एक व्हिडीओ शेअर करत आपला अनुभव सांगितला आहे. नेमकं काय झालं होत तेव्हा वाचा सविस्तर
साजिद खान जेव्हापासून बिग बॉस मध्ये गेलाय तेव्हापासून रोज काही ना काही त्याच्याबद्दल एकू येतय. जयश्रीने सांगितल की जेव्हा ती कामानिमित्त साजिद खानला भेटायला गेली तेव्हा तिच्यासोबत गैरवर्तन करण्यात आलं. ‘मी बऱ्याच दिवसांपासून मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत काम करत आहे. आठ वर्षांपूर्वी एका कास्टिंग डायरेक्टरने माझी साजिद खानसोबत एका पार्टीत ओळख करून दिली, त्यानंतर मी खूप खूश होते. त्याने मला सांगितले की उद्या तू ऑफिसला ये, मी एक चित्रपट करतोय त्यामुळे तुझ्यासाठी काही काम असेल तर बघुया.
दरम्यान, ‘मी गेलो तेव्हा तो ऑफिसमध्ये एकटाच होता. तो मला इकडे तिकडे स्पर्श करू लागला, घाणेरड्या कमेंट करू लागला. मला म्हणाले की तू खूप सुंदर आहेस, पण मी तुला काम का देऊ? मी म्हणालो काय पाहिजे सर, मी चांगला अभिनय करते. तो म्हणाला की अभिनय चालत नाही. मी जे सांगेन, जे सांगेन ते तुला करावे लागेल. हे ऐकून मला खूप राग आला आणि मी तिथून निघाले.
दरम्यान या पुर्वीही मीटू चळवळी दरम्यान अनेक अभिनेत्रींनी साजिद खानवर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. यानंतर साजिद खानच्या करिअरवरही परिणाम झाला. यावर्षी तो ‘बिग बॉस 16’ मध्ये एक स्पर्धक म्हणून दिसत आहे. मात्र, आताही बिग बॉस कमी आणि त्याच्यावर झालेल्या आरोपांमुळे चर्चेत आला आहे.