(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
यावर्षी चर्चेत असलेल्या ‘द पॅराडाइज’ या चित्रपटातील ‘आया शेर’ हे गाणे प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरत आहे. अनेक भाषांमध्ये या गाण्याने मिलियन्स व्ह्यूज मिळवले असून इन्स्टाग्रामवर रील्ससह सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या गाण्याच्या जबरदस्त एनर्जी, भव्य व्हिज्युअल्स आणि वास्तववादी सेट्समुळे प्रेक्षकांवर वेगळी छाप पडत आहे. या संपूर्ण व्हिजनला वास्तवात आणण्यासाठी मेकर्सनी विशेष प्रयत्न करत एक भव्य ‘स्लम एम्पायर’चा सेट उभारला आहे, ज्यामध्ये हिरोला स्लमचा सम्राट म्हणून सादर करण्यात आले आहे.
‘द पॅराडाइज’चा टीझर रिलीज झाल्यापासून चित्रपटाबद्दलची उत्सुकता सातत्याने वाढत आहे. टीझरला प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला असून काही वेळातच त्याने ऑनलाइन मिलियन्समध्ये व्ह्यूज मिळवले. सोशल मीडियावर या टीझरची मोठी चर्चा रंगली असून चित्रपटाबद्दलची अपेक्षा आणखी वाढली आहे. त्यामुळे ‘द पॅराडाइज’ हा यावर्षीच्या सर्वाधिक प्रतीक्षित चित्रपटांपैकी एक ठरत आहे.
या चित्रपटातील ‘आया शेर’ गाणे विशेष चर्चेत आहे. गाण्याच्या भव्यतेमागे चित्रपटाच्या आर्ट डिपार्टमेंटची मोठी मेहनत असून त्यांनी तयार केलेले सेट्स वास्तवता आणि भव्यतेचा उत्कृष्ट मिलाफ दाखवतात. यातील सर्वात खास सेट म्हणजे ‘हिरो हाउस’ किंवा कमांड सेट. हा 60 फूट रुंद, 45 फूट उंच आणि 25 फूट खोल असा विशाल स्ट्रक्चर आहे, जो हिरोच्या दमदार सीनसाठी तयार करण्यात आला. सुरुवातीला हा सेट 30 फूट रुंद होता, मात्र नंतर दोन्ही बाजूंना 15-15 फूट वाढवून त्याला आणखी भव्य स्वरूप देण्यात आले. सुमारे 25 कामगारांनी 20 दिवसांच्या मेहनतीनंतर हा सेट उभारला. वास्तववादी लुक मिळावा यासाठी ‘एजिंग’ तंत्राचा वापर करून त्याला जुनाट आणि नैसर्गिक शैलीत तयार केले.
रहस्य, थरार आणि भव्य कथा; ‘घबाडकुंड’ चित्रपटातून मराठीत ‘युनिव्हर्स’ची सुरुवात
गाण्यात आणखी एक वेगळा सेट म्हणजे बिर्याणीच्या मोठ्या भांड्यासारखा दिसणारा स्ट्रक्चर. तांब्याचा फिनिश आणि जुनाट लुक देऊन तो अगदी खरा आणि देशी वाटेल असा तयार करण्यात आला आहे. 10 फूट रुंदी, 20 फूट रेडियस आणि 6 फूट उंची असलेला हा सेट 5 ते 7 जणांच्या टीमने अवघ्या पाच दिवसांत उभारला.
याशिवाय प्रॉडक्शन टीमने 2.5 एकर जागेवर ‘वॉटर बॉडी व्हिलेज सेट’ उभारला, जो या गाण्याचा आणखी एक मोठा आकर्षण ठरतो. या सेटमध्ये डमी स्ट्रक्चर्सऐवजी 60 खरी घरे बांधण्यात आली होती. सुमारे 50 कामगारांनी 30 दिवस मेहनत करून हे संपूर्ण गाव उभारले. या सेटची रचना अशी करण्यात आली की एकाच वेळी जवळपास 500 लोक येथे उपस्थित राहू शकतील. पाण्याच्या सीनसाठी 100 टँकर पाणी आणण्यात आले आणि ते भरायला सात दिवस लागले. तसेच पाणी साठवण्यासाठी 20 फूट खोल स्वतंत्र तलावही तयार करण्यात आला.
यासोबतच ‘डंप यार्ड’चा एक भव्य सेटही तयार करण्यात आला. हा सेट 120 फूट लांब, 50 फूट रुंद आणि 30 फूट उंच असून 25 जणांच्या टीमने 30 दिवसांच्या मेहनतीने तो उभारला. या सेटला खऱ्या डंप यार्डसारखा रस्टिक आणि जुनाट लुक देण्यासाठी विशेष तंत्रांचा वापर करण्यात आला. या सर्व सेट्सची एक महत्त्वाची बाब म्हणजे ते उभारताना नैसर्गिक वातावरणाला कोणतीही हानी होणार नाही याची विशेष काळजी घेण्यात आली. आर्ट डिपार्टमेंटने परिसराशी सुसंगत अशा पद्धतीने स्ट्रक्चर्स तयार करत नैसर्गिक टेक्सचर्स आणि एजिंग तंत्रांचा मोठ्या प्रमाणात वापर केला. प्रत्येक सेटअपची योजना अत्यंत बारकाईने आखण्यात आली होती, जेणेकरून काम सुरळीत आणि क्रिएटिव्ह पद्धतीने पूर्ण होऊ शकेल.






