(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
रॅपर आणि गायक बादशाह त्याच्या “टटीरी” या नवीन गाण्याच्या रिलीजवरून वादात सापडला आहे. हरियाणा पोलिसांनी शनिवारी जाहीर केले की त्यांनी रॅपरविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे आणि लूकआउट नोटीस जारी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्याच्या “टटीरी” या गाण्यात शाळेच्या गणवेशातील मुली हरियाणा रोडवेज बसमध्ये नाचत आणि आक्षेपार्ह हावभाव करत असल्याचा आरोप आहे. बादशाहने इन्स्टाग्रामवर माफी मागितली आहे आणि म्हटले आहे की त्याचा कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता.
बादशाहने या प्रकारणेनंतर सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, या व्हिडिओमध्ये गायक माफी मागताना दिसला आहे, व्हिडिओमध्ये बादशाहने म्हटले, “माझे गाणे टटीरी रिलीज झाले आहे आणि मी पाहतो की त्याच्या काही भागाने, माझ्या बोलीभाषेत आणि त्याच्या दृश्यांमध्ये, अनेक लोकांच्या, विशेषतः माझ्या सहकारी हरियाणावासीयांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. सर्वप्रथम, मी हे सांगू इच्छितो की मी हरियाणाचा आहे. जे मला ओळखतात त्यांना माहित आहे की माझी बोलीभाषा, खाण्याच्या सवयी, जीवनशैली आणि ओळख हरियाणाची आहे. मी खूप अभिमानी हरियाणवी आहे.” मला हरियाणवी असल्याचा अभिमान आहे.’ असे बादशाहने म्हटले आहे.
थलापती विजयच्या पत्नीने दाखल केली दुसरी याचिका, संगीताने कोर्टात मांडली ‘ही’ मागणी
बादशाहने दिले स्पष्टीकरण
बादशाहने पुढे स्पष्ट केले की, “मी कधीही कोणत्याही मुलाबद्दल, कोणत्याही महिलेबद्दल, हरियाणातील कोणत्याही महिलेबद्दल इतके अश्लील बोलण्याचा विचार केला नव्हता. मी अशा हिप-हॉप शैलीतून आलो आहे जिथे गाणी अनेकदा स्पर्धेला तुच्छ लेखतात आणि द्वेष करणाऱ्यांना लक्ष्य करतात. हे कधीही कोणत्याही महिलेला किंवा मुलाला उद्देशून नव्हते.” असे गायकाने म्हटले आहे.
बादशाहचे सर्व प्लॅटफॉर्मवरून हटवले गाणे
कॅप्शनमध्ये त्याने पुढे लिहिले की, “हे गाणे सर्व प्लॅटफॉर्मवरून काढून टाकले गेले आहे.” हरियाणा पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरनुसार, तक्रारदाराने म्हटले आहे की “टटीरी” हे गाणे आणि व्हिडिओ नुकतेच बादशाहच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर रिलीज झाले होते आणि ते व्हायरल झाले होते. हरियाणा राज्य महिला आयोगानेही या गाण्याची दखल घेतली आहे आणि बादशाहला समन्स बजावले आहे.
दोन तक्रारी गायकावर दाखल
पानिपतमधील नारी तू नारायणी उत्थान समितीच्या अध्यक्षा सविता आर्य आणि शिव आरती इंडिया फाउंडेशनचे संचालक शिव कुमार यांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. दोघांचाही आरोप आहे की “टटीरी” मध्ये महिला आणि अल्पवयीन मुलांना आक्षेपार्ह भाषा आणि लैंगिक संदर्भ आहेत. तक्रारदारांनी आयोगाला कठोर कारवाई करण्याची आणि सामाजिक आणि नैतिक सीमा ओलांडणाऱ्या मजकुरासाठी जबाबदार असलेल्यांना जबाबदार धरण्याची विनंती केली आहे.






