Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 22 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘आपली यारी… गावावर भारी!’ हटके टॅगलाईनसह ‘बाप्या’ चित्रपटाच्या पोस्टने वेधले लक्ष

‘पिफ्फ’मध्ये तिहेरी सन्मान पटकावलेला ‘बाप्या’ या चित्रपटाचे पोस्ट अखेर निर्मात्यांनी प्रदर्शित केले आहे. चित्रपटाच्या या नव्या पोस्टरने चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 13, 2026 | 02:21 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ‘बाप्या’ चित्रपटाच्या पोस्टने वेधले लक्ष
  • ‘बाप्या’ अनोखी कथा आणि तगडी स्टारकास्ट
  • ‘बाप्या’ चित्रपट कधी होणार प्रदर्शित?
 

आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव मिळवलेला आणि वेगळ्या संकल्पनेमुळे चर्चेत असलेला मराठी चित्रपट ‘बाप्या’ आता प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाला आहे. “आपली यारी… गावावर भारी!” अशी हटके टॅगलाईन असलेला हा चित्रपट येत्या १५ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. वर्किंग आय फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटाचे नुकतेच प्रदर्शित झालेले पोस्टर सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत असून, त्याने प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवली आहे.

चित्रपटाच्या पोस्टरमध्ये पाठमोरी उभी असलेली एक रहस्यमय व्यक्तिरेखा दिसते आणि तिच्याकडे पाहताना गावातील इतर पात्रांच्या चेहऱ्यावर आश्चर्य, कुतूहल आणि अनेक प्रश्न उमटलेले दिसतात. विशेष म्हणजे पोस्टरमधील ही पाठमोरी व्यक्ती म्हणजे अभिनेत्री राजश्री देशपांडे असल्याचे समोर आले आहे. मात्र ती अशी पाठमोरी का उभी आहे? तिच्या आगमनाने गावात एवढे आश्चर्य का निर्माण होते? आणि तिच्या येण्याने गावात नेमके काय बदल घडणार आहेत? असे अनेक प्रश्न या पोस्टरमुळे प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाले आहेत.

छवी आणि ‘बाई-आजी’च्या अतूट नात्याची कथा; ‘मी जिंकून घेईन सारं’ मालिकेची चाहत्यांना उत्सुकता

चित्रपटाच्या कथानकाबद्दल सध्या फारशी माहिती उघड करण्यात आलेली नसली, तरी मैत्री आणि नातेसंबंधांभोवती फिरणारी ही कथा असल्याचे सांगितले जात आहे. “आपली यारी… गावावर भारी!” ही ओळ या चित्रपटातील मैत्रीची ताकद आणि त्यातून उलगडणाऱ्या रंजक घटनांची झलक देत असल्याचे दिसते आहे. त्यामुळे या चित्रपटाची कथा नेमकी काय आहे, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

या अनोख्या संकल्पनेवर आधारित चित्रपटात मराठी चित्रपटसृष्टीतील प्रतिभावान अभिनेता गिरीश कुलकर्णी झळकणार आहेत. त्यांच्यासोबत राजश्री देशपांडे, देविका दफ्तरदार, श्रीकांत यादव आणि आर्यन मेंगजी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. कलाकारांची दमदार फळी आणि पोस्टरमधील रहस्यामुळे ‘बाप्या’ या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये चांगलीच चर्चा सुरू झाली आहे.

दिग्दर्शक समीर तिवारी यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेला ‘बाप्या’ हा चित्रपट केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नसून आशयघन आणि वेगळ्या धाटणीच्या कथानकामुळे विशेष ठरणार आहे. प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाने मोठे यश मिळवत पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (PIFF) मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री असे तीन मानाचे पुरस्कार पटकावले आहेत. या तिहेरी सन्मानामुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिकच वाढली आहे.

गुरुंच्या भेटीने भावूक झाले कलाकार; स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्यातील खास क्षण

चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक समीर तिवारी म्हणाले, “हा चित्रपट मैत्री, नाती आणि त्यातून घडणाऱ्या रंजक प्रसंगांची एक वेगळी आणि अनोखी कथा आहे. प्रेक्षकांना हसवत-खेळवत एक वेगळा अनुभव देण्याचा आमचा प्रयत्न आहे. ‘आपली यारी… गावावर भारी!’ ही ओळ या चित्रपटाचा आत्माच आहे.” वर्किंग आय फिल्म्स प्रस्तुत ‘बाप्या’ या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर तिवारी यांनी केले असून मुत्कल तेलंग आणि समीर तिवारी हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.

राजश्री देशपांडे साकारणारी ही रहस्यमय व्यक्तिरेखा नेमकी कशी आहे? तिच्या आगमनाने गावात एवढी खळबळ का उडते? आणि “आपली यारी… गावावर भारी!” म्हणवणारी ही मैत्री नेमकी कोणती? या सर्व प्रश्नांची उत्तरे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच उलगडणार आहेत. त्यामुळे या वेगळ्या आणि आशयघन मराठी चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने चाहते वाट पाहत आहेत.

Web Title: Bapya marathi movie piff award girish kulkarni release on 15 may

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2026 | 02:21 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi movie
  • Marathi News

संबंधित बातम्या

करोडपती सोडून चाललेत स्वतःचाच देश; यावर्षी तब्बल 1.65 लाख लोकांनी शोधला नवा ठिकाणा, पण का?
1

करोडपती सोडून चाललेत स्वतःचाच देश; यावर्षी तब्बल 1.65 लाख लोकांनी शोधला नवा ठिकाणा, पण का?

पेट्रोल- डिझेलच्या वाढत्या दरांमुळे की… देशात EV चा क्रेझ वाढतोय? Tata Moters ला  3400 हून अधिक गाड्यांची ऑर्डर
2

पेट्रोल- डिझेलच्या वाढत्या दरांमुळे की… देशात EV चा क्रेझ वाढतोय? Tata Moters ला 3400 हून अधिक गाड्यांची ऑर्डर

पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! गुंतवणूक योजनेवर मिळणार 3.5 लाख रुपये? तुम्हालाही असा मॅसेज आलाय तर सावध व्हा…
3

पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! गुंतवणूक योजनेवर मिळणार 3.5 लाख रुपये? तुम्हालाही असा मॅसेज आलाय तर सावध व्हा…

IPO Alert: धमाक्यासाठी तयार राहा… Share Market मध्ये तब्बल 40000 कोटींचा महा-आयपीओ येतोय; सेबीकडे DRHP दाखल
4

IPO Alert: धमाक्यासाठी तयार राहा… Share Market मध्ये तब्बल 40000 कोटींचा महा-आयपीओ येतोय; सेबीकडे DRHP दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.