Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भरत दाभोळकरांची मराठी रंगभूमीवर ‘हेरगिरी चालू आहे’! स्वतः रिक्षा चालवत गाठलं नाट्यगृह; पाहा हटके प्रमोशन

प्रसिद्ध ॲड गुरु भरत दाभोळकर 'हेरगिरी चालू आहे' या नाटकासह मराठी रंगभूमीवर आले आहेत. विलेपार्ल्यात स्वतः रिक्षा चालवत त्यांनी नाटकाचे अनोखे प्रमोशन केले.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 27, 2026 | 02:57 PM
भरत दाभोळकरांची मराठी रंगभूमीवर ‘हेरगिरी चालू आहे’! स्वतः रिक्षा चालवत गाठलं नाट्यगृह; पाहा हटके प्रमोशन
Follow Us
Follow Us:

 

  • भरत दाभोळकरांची मराठी रंगभूमीवर ‘हेरगिरी चालू आहे’!
  • स्वतः रिक्षा चालवत गाठलं नाट्यगृह
  • पाहा हटके प्रमोशन
प्रसिद्ध ऍड गुरु आणि इंग्रजी, हिंदी व गुजराती रंगभूमीवर नाटकांचे विविध ट्रेंड रुजवणारे भरत दाभोळकर पहिल्यांदाच मराठीमध्ये एक नवं कोरं नाटक रंगभूमीवर दाखल झालं आहे. या नाटकाचं पूर्वीचं नाव बदलून आता नवीन मराठमोळं नाव आणि वेगळं रूप नाटकाला देण्यात आलं आहे. या बदलाची घोषणा करण्यासाठी भरत दाभोळकरांनी आपल्या स्वतःच्या मालकीच्या रिक्षेवर त्या नाटकाचे पोस्टर लावून विलेपार्ल्यामध्ये ही रिक्षा फिरवली आणि त्याच रिक्षेने ते विलेपार्लेच्या दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात नाटकाचा प्रयोग करायला दाखलही झाले.

दाभोळकर हे आपल्या विविध छंदांसाठीसुद्धा ओळखले जातात. त्यांना गाड्यांचा प्रचंड शौक आहे. त्यांच्याकडे विविध पद्धतीच्या गाड्या असून त्यांच्या मालकीच्या दोन रिक्षा आणि रिक्षेचा लायसन्स व बिल्लाही त्यांच्याजवळ आहे.

पिंट्या झाला बाबा; ‘होणार सून मी या घरची’ फेम रोहन गुजरने तीन महिन्यांनी शेअर केला पहिला फोटो

नुकतंच रंगभूमीवर दाखल झालेल्या ‘कॅरी ऑन स्पाईंग’ या दाभोळकरांच्याच इंग्रजी नाटकावर आधारित असलेल्या या मराठी नाटकाचं नाव “हेरगिरी चालू आहे” असं बदलण्यात आलं असून त्यामध्ये मराठी प्रेक्षकांना नवीन अशी खास दाभोळकरी शैली वापरण्यात आली आहे. मराठी रंगभूमीवरील काही प्रसिद्ध कलाकार त्यात काम करीत आहेत. नाटकाचे ७ प्रयोगही झाले आहेत. ‘सवाईगंधर्व’ निर्मित आणि ‘अभिजात’ प्रकाशित या नाटकाची निर्मिती तरुण निर्माता आकाश भडसावळे याने केली असून या संस्थांचं हे सातवं नाटक आहे.

भरत दाभोळकरांसारख्या मोठ्या हस्तीना मराठी रंगभूमीवर आणण्याचं आणि एक वेगळ्या प्रकारचं मराठी प्रेक्षकांना पूर्णतः नवीन असा – ‘ब्लॅक ह्युमर’ असलेलं हे नाटक निर्मित आणण्याचं धाडस आकाशने केलं आहे. त्या निमित्ताने इंग्रजी आणि हिंदी रंगभूमीवर काम करणारे लेखक-दिग्दर्शक भरत दाभोळकर आणि अभिनेते मोहन आझाद यांनी प्रथमच मराठी रंगभूमीवर पदार्पण केलं आहे. त्यांच्या या वेगळ्या शैलीतील नाटक मराठी रसिकांना एक अनोखी पर्वणी असेल; मात्र हे नाटक तद्दन विनोदी शैलीतील नसून इंग्रजी रंगभूमीवर गाजलेल्या आणि अनेक वेळा आपलं अस्तित्व दाखवून देणाऱ्या दाभोळकरी ह्युमरचं दर्शन या नाटकात घडतं. देशोदेशीच्या विविध कलांना स्वीकारणारा मराठी प्रेक्षक या एका वेगळ्याच बाजाचंही निश्चिच स्वागतच करेल अशी खात्री या नाटकाच्या टीमला आहे. अर्थात हे वेगळेपण पाहायला नाट्यगृहात एकदा तरी जाऊन हे नाटक पाहायलाच पाहिजे, कारण नाट्यगृहात ही “हेरगिरी चालू आहे”.

“माझ्या मुलाला मासिक पाळीबद्दल…”, अभिनेत्री गिरिजा ओकचे संस्कार! तिच्या १२ वर्षांच्या लेकाचा किस्सा वाचून तुम्हीही कराल कौतुक

Web Title: Bharat dabholkar debut marathi theatre hergiri chalu aahe natak promotion

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2026 | 02:57 PM

Topics:  

  • entertainment
  • Entertainment News
  • marathi

संबंधित बातम्या

Tarak Mehta: तारक मेहता का उल्टा चष्माच्या ‘TMKOC क्लब हाऊस ॲप’वरील लाइव्ह क्विझच्या विजेत्याची घोषणा
1

Tarak Mehta: तारक मेहता का उल्टा चष्माच्या ‘TMKOC क्लब हाऊस ॲप’वरील लाइव्ह क्विझच्या विजेत्याची घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.