Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Abhanga Tukaram: संत तुकारामांचा जीवनप्रवास मोठ्या पडद्यावर! दिग्पाल लांजेकरांचा ‘अभंग तुकाराम’ ७ नोव्हेंबरला होणार प्रदर्शित

दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित 'अभंग तुकाराम' चित्रपट ७ नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे. योगेश सोमण संत तुकाराम महाराजांच्या भूमिकेत; पॅनोरमा स्टुडिओज निर्मित या चित्रपटात १० अभंगांचा समावेश आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Oct 30, 2025 | 07:38 PM
दिग्पाल लांजेकरांचा 'अभंग तुकाराम' ७ नोव्हेंबरला होणार प्रदर्शित (Photo Credit - X)

दिग्पाल लांजेकरांचा 'अभंग तुकाराम' ७ नोव्हेंबरला होणार प्रदर्शित (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:
  • महाराष्ट्राच्या अध्यात्मिक परंपरेचा कळस!
  • योगेश सोमण संत तुकाराम महाराजांच्या भूमिकेत
  • चित्रपटात तब्बल १० अभंगांचा समावेश
Abhanga Tukaram: महाराष्ट्राला संत-महात्म्यांची उज्ज्वल परंपरा आहे. माऊलींच्या ज्ञानेश्वरीने महाराष्ट्राच्या आध्यात्मिक जीवनाचा पाया रचला आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या अभंगांनी त्याच्यावर कळस चढवला. संत तुकारामांची भावकविता म्हणजे अभंग, हे अभंग महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहेत. संत तुकाराम महाराष्ट्राच्या हृदयात अभंगरूपाने ते स्थिरावले आहेत. जीवनप्रवाहात कायम राहून त्यांनी घेतलेला परमेश्वरप्राप्तीचा ध्यास आणि यातून घडलेला त्यांचा आध्यात्मिक प्रवास चकित करणारा आहे.

लौकिकाडून अलौकिकाकडे नेणारा संत तुकाराम यांचा हा जीवनप्रवास ‘अभंग तुकाराम’ या चित्रपटातून दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी मांडला आहे. पॅनोरमा स्टुडिओज, चित्रकथी क्रिएशन्स निर्मित ‘अभंग तुकाराम’ ७ नोव्हेंबरला आपल्या भेटीला येणार आहे. पॅनोरमा स्टुडिओज ही निर्मिती संस्था या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. पॅनोरमा स्टुडिओचे कुमार मंगत पाठक चित्रपटाचे निर्माते आहेत. त्यासोबत अभिषेक पाठक, अजय अशोक पूरकर, दिग्पाल लांजेकर यांनीही निर्मितीची धुरा सांभाळली असून सहनिर्माते मुरलीधर छतवानी, रवींद्र औटी आहेत.

दिव्य अनुभवाची प्रचिती देणाऱ्या या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित आहे. प्रेमरूप भक्तितत्त्वातून वास्तवाचे दर्शन घडविताना लोकजीवनातील भक्तीची गंगा अखंड वाहती ठेवून उभ्या केलेल्या जीवनवादी विवेकदर्शनाची झलक या ट्रेलरमधून दिसुन येते आहे. प्रसिद्ध अभिनेते योगेश सोमण जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या भूमिकेत आहेत तर त्यांच्या पत्नीच्या आवलीच्या भूमिकेत अभिनेत्री स्मिता शेवाळे दिसणार आहे त्यासोबत मृणाल कुलकर्णी, समीर धर्माधिकारी, अजय पुरकर, विराजस कुलकर्णी, अभिजित श्वेतचन्द्र, अजिंक्य राऊत, निखिल राऊत, बिपीन सुर्वे, सचिन भिलारे, अवधूत गांधी, नुपूर दैठणकर,तेजस बर्वे, ईश्मिता जोशी, रुद्र कोळेकर, अभीर गोरे या कलाकारांच्या चित्रपटात भूमिका आहेत.

‘अभंग तुकाराम’ चित्रपटाची कथा आणि संवाद प्रसिद्ध लेखक योगेश सोमण यांचे आहे. दिग्पाल लांजेकर यांनी पटकथा आणि दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. वारकरी संगीत हा चित्रपटाचा आत्मा आहे. अभंग गाथा हा विषय असल्याने तब्बल १० अभंगांचा समावेश या चित्रपटात करण्यात आलेला आहे. प्रसिद्ध गायक संगीतकार अवधूत गांधी यांनी या चित्रपटाच्या संगीताची धुरा सांभाळली आहे. अवधूत गांधी, बेला शेंडे, अजय पूरकर, जयदीप वैद्य, अजित विसपुते, चंद्रकांत माने, नूतन परब, अमिता घुगरी, मुक्ता जोशी, ईश्वरी बाविस्कर, ज्ञानेश्वर मेश्राम, केदार जोशी या गायकांचा स्वरसाज चित्रपटातील गाण्यांना लाभला आहे.

चित्रपटाचे छायांकन संदीप शिंदे यांचे आहे. संकलन सागर शिंदे, विनय शिंदे यांचे आहे. रंगभूषा अतुल मस्के तर वेशभूषा सौरभ कांबळे यांची आहे. संगीत संयोजन आणि पार्श्वसंगीताची जबाबदारी मयूर राऊत यांनी सांभाळली आहे. ध्वनी आरेखन निखिल लांजेकर, हिमांशू आंबेकर यांचे आहे. साहसदृश्ये बब्बू खन्ना यांची आहेत. नृत्यदिग्दर्शन सुमित साळुंखे तर कलादिग्दर्शन प्रतीक रेडीज, संजय करोले यांचे आहे. निर्मिती पश्चात प्रक्रिया सचिन भिल्लारे यांची आहे. व्हीएफएक्स ची जबाबदारी शॉक अँड ऑ फिल्म्स यांनी तर व्हिजुअल प्रमोशनची जबाबदारी कॅटलिस्ट क्रिएटस यांनी सांभाळली आहे. सिनेमन एंटरटेनमेंटचे जय गोटेचा मार्केटिंग डायरेक्टर आहेत. कार्यकारी निर्मात्या केतकी गद्रे अभ्यंकर आहेत. पॅनोरमा स्टुडिओज जगभरात (वर्ल्ड वाईड) या चित्रपटाचे वितरण करणार आहे.

Web Title: Digpal lanjekars abhang tukaram to be released on november 7th

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2025 | 07:37 PM

Topics:  

  • marathi movie
  • sant tukaram

संबंधित बातम्या

‘मामाच्या गोव्याला जाऊया’मध्ये रंगणार दोस्तीचा धम्माल प्रवास; अंकुश चौधरीची एन्ट्री चर्चेत
1

‘मामाच्या गोव्याला जाऊया’मध्ये रंगणार दोस्तीचा धम्माल प्रवास; अंकुश चौधरीची एन्ट्री चर्चेत

Ghabadkund Movie : भल्या-भल्यांना घाम फोडणारी रंगी येतेय! ‘घबाडकुंड’मध्ये स्मिता पायगुडे अंजुटेची काळजाचा ठोका चुकवणारी भूमिका
2

Ghabadkund Movie : भल्या-भल्यांना घाम फोडणारी रंगी येतेय! ‘घबाडकुंड’मध्ये स्मिता पायगुडे अंजुटेची काळजाचा ठोका चुकवणारी भूमिका

Abhang Tukaram : टाळ-मृदंगाच्या गजरात आता OTTवर तुकोबांची गाथा, ‘अभंग तुकाराम’चा दमदार ट्रेलर रिलीज!
3

Abhang Tukaram : टाळ-मृदंगाच्या गजरात आता OTTवर तुकोबांची गाथा, ‘अभंग तुकाराम’चा दमदार ट्रेलर रिलीज!

Raja Shivaji Box Office Collection: बॉक्सऑफिसवर ‘राजा शिवाजी’चा धुरळा ; सलग दहाव्या दिवशी ‘इतक्या’ कोटींची कमाई
4

Raja Shivaji Box Office Collection: बॉक्सऑफिसवर ‘राजा शिवाजी’चा धुरळा ; सलग दहाव्या दिवशी ‘इतक्या’ कोटींची कमाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.