Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 19 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“मॅजिक” एक दरवळणारं मायाजाल; एन्काऊंटर स्पेशलिस्टच्या भूमिकेत दिसणार जितेंद्र जोशी !

'मॅजिक' हा मराठी चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये जितेंद्र जोशी एन्काऊंटर स्पेशलिस्टच्या खास भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची कथा काय असेल? हे आपण आता जाणून घेणार आहोत.

  • By सायली ससाणे
Updated On: Dec 01, 2025 | 12:14 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • “मॅजिक” एक दरवळणारं मायाजाल
  • एन्काऊंटर स्पेशलिस्टच्या भूमिकेत जितेंद्र जोशी
  • “मॅजिक” कधी होणार प्रदर्शित
 

आजवर अनेक भूमिकांतून आपल्या अभिनयाची जादू दाखवल्यानंतर आता अभिनेता जितेंद्र जोशी नव्या वर्षात ‘मॅजिक’ चित्रपटामध्ये दिसणार आहे. मॅजिक या सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपटात जितेंद्र जोशी एन्काऊंटर स्पेशलिस्टच्या भूमिकेत दिसणार असून, १ जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आज नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले आहे. ज्याला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

महाराष्ट्राची इच्छा पूर्ण! सलमान खानने जाहीर केला बिग बॉस मराठीच्या होस्टचे नाव; नव्या सिझनची ठरली तारीख

तुतरी व्हेेंचर्स या निर्मिती संस्थेच्या राजू सत्यम यांनी “मॅजिक” या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘आई कुठे काय करते’सारख्या उत्तमोत्तम मालिकांचं दिग्दर्शन केलेल्या रवींद्र विजया करमरकर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केले आहे. तसेच योगेश विनायक जोशी, रवींद्र विजया करमरकर यांनी कथालेखन, तर योगेश विनायक जोशी, अभिषेक देशमुख यांनी पटकथा लेखन केलं आहे. केदार फडके यांनी छायांकन तर मंदार चोळकर वैभव जोशी यांनी लिहिलेल्या गीतांना देवेंद्र भोमे, चिनार-महेश यांनी संगीत दिले आहे.

तसेच, दिनेश पुजारी, नयनेश डिंगणकर यांनी चित्रपटाच्या संकलनाची जबाबदारी निभावली आहे. चित्रपटात जितेंद्र जोशी, सिद्धीरुपा करमरकर, जुई भागवत, प्रियांका पालकर, मयूर खांडगे, अभिजित झुंजारराव, रुपा मांगले, नितीन भजन, गुरुराज कुलकर्णी, योगेश केळकर, प्रदीप डोईफोडे, रसिकराज यांच्या प्रमुख भूमिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट अनेक महोत्सवांमध्ये देखील गौरवला गेला आहे. आता हा चित्रपट सिनेमागृहात काय धुमाकूळ घालतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा ‘कैरी’चा दमदार ट्रेलर रिलीज, टर्न आणि ट्विस्टने वाढवली उत्सुकता

“मॅजिक” या चित्रपटात अरूण राऊत या एन्काऊंटर स्पेशलिस्ट असलेल्या पोलिस अधिकाऱ्याची गोष्ट उलगडण्यात आली आहे. सायकोलॉजिकल थ्रिलर असलेल्या या “मॅजिक” चित्रपटाची गोष्ट नक्की काय आहे हे जाणून घेण्यासाठी अजून थोडी वाट पहावी लागणार आहे. आजवर अनके फेस्टिवलमध्ये या चित्रपटाने आपली वेगळी मोहोर उमटवली असून उत्तम स्टारकास्ट, रंजक कथानक असलेला “मॅजिक” चित्रपट मोठ्या पडद्यावर १ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Jitendra joshis marathi film magic will be released in theaters on january 1st

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 01, 2025 | 12:14 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi actor
  • marathi cinema

संबंधित बातम्या

Samarth Teaser Out: समर्थ रामदास स्वामींच्या प्रेरणादायी विचारांना आधुनिक स्पर्श; ‘समर्थ’ चित्रपटाचा बहुप्रतीक्षित टीझर प्रदर्शित
1

Samarth Teaser Out: समर्थ रामदास स्वामींच्या प्रेरणादायी विचारांना आधुनिक स्पर्श; ‘समर्थ’ चित्रपटाचा बहुप्रतीक्षित टीझर प्रदर्शित

Indrajaal Movie Trailer : सत्य की भ्रम? रहस्याचा पडदा उघडणार, ‘इंद्रजाल’च्या ट्रेलरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता
2

Indrajaal Movie Trailer : सत्य की भ्रम? रहस्याचा पडदा उघडणार, ‘इंद्रजाल’च्या ट्रेलरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता

Nikhil Rajeshirke : लक्ष्मी निवास’ फेम निखिल राजेशिर्केच्या मुलाचं बारसं; नावाचा खास अर्थही केला शेअर, बारशाचा व्हिडिओ व्हायरल
3

Nikhil Rajeshirke : लक्ष्मी निवास’ फेम निखिल राजेशिर्केच्या मुलाचं बारसं; नावाचा खास अर्थही केला शेअर, बारशाचा व्हिडिओ व्हायरल

Pushkaraj Chirputkar: विनोदी भूमिकांनंतर पुष्कराज चिरपुटकरचा आध्यात्मिक प्रवास; ‘समर्थ’मधील भूमिकेबद्दल शेअर केला अनुभव
4

Pushkaraj Chirputkar: विनोदी भूमिकांनंतर पुष्कराज चिरपुटकरचा आध्यात्मिक प्रवास; ‘समर्थ’मधील भूमिकेबद्दल शेअर केला अनुभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.