
Marathi Serial TRP: मराठी मालिकांना प्रेक्षकांची सर्वाधिक पसंती मिळत असल्याचं दिसून येत आहे. टीआरपीच्या या शर्यतीत झी मराठी आणि स्टार प्रवाह या दोन्ही वाहिनीवरच्या मालिकांनी बाजी मारली आहे कोणत्या आहे या मालिका चला तर मग जाणून घेऊयात.
झी मराठी वाहिनीवरील ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेतील स्वानंदी आणि समरच्या शाही लग्नसोहळ्याला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. फक्त शाही लग्नसोहळाच नाही तर समर स्वानंदीच्या जोडीला मालिकेच्या पहिल्या भागापासूनच सर्वाधिक पसंती मिळत आहे. यातच आता मराठी मालिकांच्या या आठवड्याभरातील टीआरपी रेटींग समोर आली आहे. 1 ते 7 नोव्हेंबर या कालावधीत मराठी मालिकांनी चांगली बाजी मारली आहे.
TRP स्पर्धेत झी मराठीच्या’ कमळी’ मालिकेने एन्ट्री घेतली आहे. खूुप कमी दिवसांत या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली. सध्या ‘कमळी’ आणि’ तारिणी’ या दोन्ही मालिकांता महासंगम सुरु असल्याने अन्नपुर्णा कॉलेज ड्रग्ज प्रकरणात लवकरच सत्याचा उलगडा होणार आहे. या मालिकेबाबात आणखी सांगायचं झालंच तर न्यूयॉर्कच्य़ा टाईम्स स्वेअरवर कमळी मालिकेचा प्रोमो देखील झळकलेला आहे. त्यामुळे आंरराष्ट्रीय स्तरावर बाजी मारणारी ही पहिलीच मराठी मालिका आहे.
TRP स्पर्धेत चौथ्य़ा स्थानावरची मालिका म्हणजे, ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ आणि ‘नशिबवान’ या दोन मालिकांना 4.1 रेटींग मिळालेलं आहे. जीवा आणि नंदिनी तसंच काव्या पार्थ या दोन जोड्यांमधली केमिस्ट्री देखील प्रेक्षकांना तितकीच भावतेय. त्याचबरोबर नशिबाचा फेरा कोणाला कसा चुकता करावा लागेल काही सांगता येत नाही, हेच नशीब आता गिरीजाला तिच्या सत्यापर्यंत पोहोचवणार का ? या प्रश्नाने आता प्रेक्षकांची उत्कंठा वाढलेली दिसत आहे. 9 च्य़ा स्लॉटला असलेली ‘नशिबवा’न मालिका हळूहळू प्रेक्षकांनी मनं जिंकतेय.
TRP च्या तिसऱ्या यादीतील मालिका म्हणजे ‘घरोघरी मातीच्या चुली’. ऋषिकेश आणि जानकीच्या लग्नाआधीच्या लव्हस्टोरी प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद पाहायला मिळतोय. खूप दिवस हा मास्क मॅन नक्की आहे तरी कोण हगा प्रश्न कायम भेडसावत होता, जानकीच्या भूतकाळातील सत्य नेमकं काय ते आता प्रेक्षकांच्या समोर येत आहे. लग्नाआधीच्या जानकीच्या आयुष्यातील मकरंद नावाची व्यक्तीचं हळूहळू सत्य उलगडत जात असून मालिकेच्या या नव्या वळणाला प्रेक्षक चांगलाच प्रतिसाद देत आहेत.
जानकी आणि ऋषिकेशच्या लग्नाआधीच्या लव्हस्टोरीप्रमाणेच आता ईश्वरी आणि अर्णवच्या लग्नानंतरच्या हळूहळू फुलणाऱ्या प्रेमाला देखील सकारात्नक प्रतिसाद मिळत आहे. स्टार प्रवाह मालिकेवरील’ तु ही रे माझा मितवा’ या मालिकेने TRP च्या शर्यतीत दुसरं स्थान मिळवलं आहे. तर नेहमीप्रमाणे ‘ठरलं तर मग’ मालिकेने सलग पहिल्या स्थानावर बाजी मारली आहे. मराठी मालिकांचा वाढणारा TRP पाहता प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे.