फोटो सौजन्य - Social Media
सध्या सोशल मीडिया तसेच टीव्हीवरदेखील ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेने जबरदस्त प्रचार केल्याचा दिसून येत आहे. (TRP Rating of Marathi Serials) मंदिरात जाऊन पत्रिका वाटप असुद्या किंवा चांगल्या डेस्टिनेशनवर जाऊन लग्न करणे. सगळंकाही वास्तव असल्याचे चित्र मालिकेने रेखाटले होते. याचा फायदा मालिकेला नक्कीच झाला आहे कारण मालिकेला जबरदस्त TRP मिळाला आहे आणि या प्रचारानंतर मालिकेला लोकप्रियताही चांगली मिळाली आहे.
मालिका पाहणाऱ्यांमध्ये वाढ झाली असून ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेने ३.६ रेटिंग मिळवली आहे. एकंदरीत, मालिकेने चांगली स्ट्रॅटर्जी वापरली आहे पण बाजी मात्र स्टार प्रवाहाच्या ‘ठरलं तर मग!’ या मालिकेने मारली आहे. ५.६ रेटिंगसह मालिका मराठी TV क्षेत्रात टॉप करत आहे. त्यानंतर तू ही रे माझा मितवा ‘५.०’ रेटिंगसह आघाडीवर आहे. घरोघरी मातीच्या चुली ही मालिका ‘४.६’ रेटिंगसह मालिका क्षेत्रात तिसऱ्या स्थानी आहे. लग्नानंतर होईलच प्रेम व नशीबवान मालिकेला ४.१ रेटिंग मिळाली आहे तर कमळी या मालीकेने पहिल्यादाच टॉप ५ मध्ये स्थान मिळवले आहे. या मालिकेने ३.९ रेटिंग मिळवली आहे. तर “ठरलं तर मग, तू ही रे माझा मितवा, घरोघरी मातीच्या चुली, लग्नानंतर होईलच प्रेम/ नशीबवान, कमळी” या मराठी मालिका TRP मध्ये ‘टॉप ५’ ठरल्या आहेत. विशेष गोष्ट म्हणजे आदिनाथ कोठारेची नवीन मालिका नशीबवानने थोड्याच वेळात फार लोकप्रियता मिळवली आहे.
पुढे लक्ष्मीच्या पाऊलांनी मालिकेने ३.७ रेटिंग मिळवली आहे. तर लक्ष्मी निवास/ वीण दोघांतली ही तुटेना या मालिकेने ३.६ रेटिंग मिळवली आहे. येड लागलं प्रेमाचं ३.३ तर तारिणी या नवीन मालिकेने ३.२ रेटिंग मिळवले आहे. देवमाणूसने २.९ रेटिंग तर काजळमाया (नवीन मालिका)ने २.६ रेटिंगसह ११ वे स्थान मिळवले आहे. आधी लोकरीप्रिय असणारी मालिका ‘कोण होतीस तू, काय झालीस तू!’ आता टॉप १५ मध्येही दिसून येत नसल्याचे चित्र समोर आले आहे तर लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेलाही TRP मध्ये घसरणीला सामोरे जावे लागले आहे.






