Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘क्रांतीज्योती विद्यालय’ मराठी प्रेक्षकांनी भरली! पहिल्या आठवड्यातच बजेटपेक्षा तिप्पट कमाई

सध्या चित्रपटगृहात 'क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम' हा चित्रपट धुमाकूळ घालत आहे. नवीन वर्षात हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कोटींची कमाई करतोय. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 10, 2026 | 04:26 PM
'क्रांतीज्योती विद्यालय' मराठी प्रेक्षकांनी भरली!

'क्रांतीज्योती विद्यालय' मराठी प्रेक्षकांनी भरली!

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम’ चित्रपटातला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद
  • पहिल्या आठवड्यातच केली बजेटपेक्षा तिप्पट कमाई
  • जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन
राज्यभरात मराठी शाळांची काय अवस्था झाली आहे, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. कित्येक पालक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमात आणि त्यातही इंटरनॅशनल स्कुल्समध्ये घालत आहे. यामागे असा समाज असतो की मुलांना जास्त सोयीसुविधा मिळाल्या की ते जास्त शिकतील. मात्र, या सर्वात शिक्षणाची खरे बीज रोवणाऱ्या शिक्षकांकडे खासकरून मराठी शाळेतील शिक्षकांकडे दुर्लक्ष केले जाते. इंग्रजी माध्यमात आणि इंटरनॅशनल स्कुल्समध्ये शिकण्याकडे पालकांचा जास्त कल असल्याने मराठी शाळा महाराष्ट्रात बंद पडताना दिसत आहे. याच विषयावर आलेला मराठी चित्रपट म्हणजे ‘क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम’.

नवीन वर्षात प्रदर्शित झालेला ‘क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच चालतोय. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर होत होती. दमदार स्टार कास्ट, हेमंत ढोमे यांचे दिग्दर्शन आणि ज्वलंत विषय यामुळे या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये चांगलेच कुतूहल पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रभरात फोक आख्यान गाजवण्याऱ्या संगीतकारांनी म्हणजेच हर्ष-विजय यांनी या चित्रपटाला संगीत दिले आहे.

O Romeo Teaser: हातात गजरा, कानात बाळी; मासी-क्लासी लूकमध्ये दिसला रोमियो, टीझर बघून विसरून जाल कबीर सिंग

चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद

चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षक आणि समीक्षकांनी याचे भरभरून कौतुक केले. या चित्रपटातील गाणी आधीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरून सुपरहिट ठरली होती. त्यातच या सिनेमाचा विषय विशेषतः मराठी शाळेत शिक्षण घेतलेल्या प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करणारा असल्याने एक भावनिक नातं निर्माण झालं आहे. त्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी प्रेक्षक पुन्हा एकदा या मराठी चित्रपटाकडे आकर्षित होत आहेत. चला या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल जाणून घेऊयात.

Bigg Boss Marathi 6 : 11 जानेवारीला घराघरात शिरणार महाराष्ट्राचं तुफान! ग्रँड प्रीमियरचा रंगतदार सोहळा रंगणार

पहिल्याच आठवड्यात बजेटपेक्षा तिप्पट कमाई झाली!

‘क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम’ चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात 6. 14 कोटींची दमदार कमाई केली आहे. याबाबत चित्रपटाच्या टीमने सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. तसेच माहितीनुसार, चित्रपटाचे बजेट कोटी असल्याचे बोलले जात आहे. एकंदरीत चित्रपटाने बजेटपेक्षा जास्त कमाई केली आहे.

दमदार प्रमोशन

चित्रपटाच्या टीमने महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये जाऊन अनेक शाळांमध्ये या सिनेमाचे प्रमोशन केले होते. या दरम्यान कलाकारांनीही आपल्या शालेय आठवणींना उजाळा दिला. आताही अनेक जण आपल्या शाळेतील मित्र-मैत्रिणींसोबत हा सिनेमा पाहण्यासाठी आवर्जून जात आहेत.

 

Web Title: Krantijyoti vidyalay marathi madhyam collected more than 6 crores at box office in 1st week

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 10, 2026 | 04:25 PM

Topics:  

  • Box Office
  • marathi entertainment
  • marathi film
  • marathi movie
  • Prajakta Koli

संबंधित बातम्या

‘जुनी गाणी, नवे सूर…’ ‘अगं अगं सूनबाई!’चा खास संगीतप्रयोग, ‘दिवस तुझे हे फुलायचे’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीला!
1

‘जुनी गाणी, नवे सूर…’ ‘अगं अगं सूनबाई!’चा खास संगीतप्रयोग, ‘दिवस तुझे हे फुलायचे’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीला!

”एक ह्रदयस्पर्शी..”, दशावतारची ऑस्करसाठी निवड झाल्यानंतर सोनाली बेंद्रेची खास पोस्ट, म्हणाली…
2

”एक ह्रदयस्पर्शी..”, दशावतारची ऑस्करसाठी निवड झाल्यानंतर सोनाली बेंद्रेची खास पोस्ट, म्हणाली…

‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ चित्रपटाचा भव्य ट्रेलर अनावरण सोहळा संपन्न!
3

‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ चित्रपटाचा भव्य ट्रेलर अनावरण सोहळा संपन्न!

रणपती शिवराय चित्रपटातून चिन्मय मांडलेकरची एक्झिट! ‘या’ कारणामुळे शिवरायांची भूमिका करण्यास दिला नकार
4

रणपती शिवराय चित्रपटातून चिन्मय मांडलेकरची एक्झिट! ‘या’ कारणामुळे शिवरायांची भूमिका करण्यास दिला नकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.