Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शब्दांशिवाय नात्यांची गोष्ट सांगणारं ‘माया’चं मोशन पोस्टर रिलीज; कधी होणार चित्रपट प्रदर्शित?

मराठी चित्रपटाची चर्चा सध्या सर्वत्र होत असल्याचे दिसून येत आहे. आता अशातच ‘माया’ या आगामी चित्रपटाचं पोस्टर रिलीज झाले आहे. ज्यामध्ये तगडे मराठी कलाकार काम करताना दिसणार आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Jan 18, 2026 | 09:40 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • शब्दांशिवाय मांडणार नात्यांची गोष्ट
  • ‘माया’ चित्रपटाचं मोशन पोस्टर रिलीज
  • जाणून घ्या कधी होणार चित्रपट रिलीज ?
 

कधी कधी एखादं चित्रच खूप काही सांगून जातं… शब्दांशिवाय भावना व्यक्त करतं… आणि ‘माया’ या आगामी मराठी चित्रपटाचं मोशन पोस्टर मधून नेमकं हेच अशीच गोष्ट मांडणार आहे. नातेसंबंधांवर भाष्य करणारा ‘माया’ या चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले असून, पहिल्याच नजरेत ते मनाला स्पर्श करून जाणार आहे. हे पोस्टर केवळ चित्रपटाची झलक देत नाही, तर नात्यांमधील जिव्हाळा, तडे, अंतर आणि स्वीकार यांचा अर्थपूर्ण संवाद घडवून आणत आहे.

Bigg Boss Marathi 6: असा आला आणि तसा गेला! पहिल्या नॉमिनेशनमध्ये ‘हा’ स्पर्धक होणार बाद, जाणार घराबाहेर

मोशन पोस्टरमध्ये वेगवेगळ्या पिढ्यांतील सदस्य एकत्र दिसतात. त्यांच्या नात्यांमधील समजूतदारपणा, आपुलकी, अंतर आणि तरीही टिकून राहाणारी माया हे भाव अतिशय शांतपणे मांडण्यात आल्याचे दिसते आहे. पोस्टरमध्ये मुक्ताच्या हातात दिसणारा तुटलेला कप हा केवळ अपघाताने तुटलेली वस्तू नसून, तो नात्यांमधील तडे, न बोललेली दुःखं आणि आयुष्यात येणारी पोकळी दर्शवतो आहे. तो कप पाहाताना मनात सहज प्रश्न पडतो, एखादं नातंही असंच नकळत तुटलेलं आहे का? ज्याच्या कडा अजूनही हातात आहेत, पण ते पूर्वीसारखं पूर्ण राहिलेलं नाही? हातात तुटलेला कप असतानाही मुक्ताच्या चेहऱ्यावरचं शांत, हलकंसं हास्य हे दुःख नाकारत नाही, तर स्वीकारत आहे, असे दिसते आहे.

 

चित्रपटाबद्दल बोलताना चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य इंगळे म्हणाले, ”’माया’ म्हणजे फक्त प्रेम नाही, तर एकमेकांना समजून घेणं, स्वीकारणं आणि काळाच्या ओघातही नातं जपणं. आयुष्यात सगळंच नीटनेटके असतं असं नाही. काही गोष्टी तुटतात, काही नाती बदलतात. मुक्ताच्या हातातील कप त्याचेच प्रतीक आहे, तर तिचं हास्य हे सगळं स्वीकारत आहे. या मोशन पोस्टरमधून आम्हाला चित्रपटाची भावना शब्दांशिवाय पोहोचवायची होती.” असे ते म्हणाले आहेत.

‘धमाल 4’ खळखळून हसवण्यासाठी सज्ज! ‘या’ तारखेला होणार रिलीज

शालिनी सिनेमाज आणि नितीन वैद्य प्रॉडक्शन निर्मित ‘माया’ चित्रपटाचे डॉ. सुनील दातार, अलका मधुकर दातार, नितीन प्रकाश वैद्य निर्माते आहेत. आदित्य इंगळे दिग्दर्शित या चित्रपटामध्ये मुक्ता बर्वे, गिरीश ओक, सिद्धार्थ चांदेकर, विजय केंकरे आणि रोहिणी हट्टंगडी यांच्या प्रमुख भूमिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. येत्या २७ फेब्रुवारी २०२६ रोजी हा चित्रपट संपूर्ण सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. पोस्टरमुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली असून, नात्यांच्या गुंत्यातून उमटणारी ही कथा प्रेक्षकांच्या मनाला नक्कीच भिडेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Web Title: Mukta barve marathi movie maya motion poster released

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 18, 2026 | 09:40 AM

Topics:  

  • entertainment
  • marathi cinema
  • Marathi News

संबंधित बातम्या

Ambani: अंबानींचा मास्टरस्ट्रोक! 10रुपयांच्या आईस्क्रीममधून रिलायन्सची बाजारात नवी एन्ट्री
1

Ambani: अंबानींचा मास्टरस्ट्रोक! 10रुपयांच्या आईस्क्रीममधून रिलायन्सची बाजारात नवी एन्ट्री

I Phone 16 Price Drop: नवा iPhone येण्याआधी मोठी ऑफर! iPhone 16 वर थेट 15,000 पर्यंत बचत
2

I Phone 16 Price Drop: नवा iPhone येण्याआधी मोठी ऑफर! iPhone 16 वर थेट 15,000 पर्यंत बचत

Belkin New Earbuds 2026: छोटा पॅकेट बडा धमाका!! Belkinच्या नव्या Earbuds-Headphonesची जोरदार एन्ट्री
3

Belkin New Earbuds 2026: छोटा पॅकेट बडा धमाका!! Belkinच्या नव्या Earbuds-Headphonesची जोरदार एन्ट्री

Ambani House Antilia: अंबानींच्या अँटिलियालाही टक्कर! ‘या’ उद्योगपतीच्या घराची किंमत ऐकून व्हाल थक्क
4

Ambani House Antilia: अंबानींच्या अँटिलियालाही टक्कर! ‘या’ उद्योगपतीच्या घराची किंमत ऐकून व्हाल थक्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.